नवी दिल्ली: () यांनी नाव न घेता चीनवर () जोरदार प्रहार केला आहे. विकासाच्या योजनांच्या बहाण्याने शेजाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवायचे आणि त्या देशांना आपली वसाहत बनवायची असा भारत देश नाही, असे मोदी म्हणाले. विकासाच्या भागीदारीच्या (Development Partnership) नावावर अनेक देशांना अवलंबीत भागीदारीसाठी (Dependence Partnership) करण्यासाठी भाग पाडायचे याचा इतिहासाने आम्हाला धडा शिकवला आहे, असेही मोदी म्हणाले. यामुळे वसाहतवादी आणि साम्राज्यवादी शासनाचा आरंभ झाला आहे. या मुळे जागतिक शक्तींचे वेगवेगळे गट स्थापन झाल्याचेही मोदी म्हणाले.

भारताच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या मॉरिशसमधील सुप्रीम कोर्टाच्या इमारतीच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते.

जगातील इतर देशांसोबत विकासाच्या भागीदारीमागे काय भावना असते हे देखील पंतप्रधानांनी समजावून सांगितले. या वेळी त्यांनी अफगाणिस्तानापासून ते नायजेरियापर्यंतची उदाहरणे दिली. भारत हा देश जगातील देशांचे सार्वभौमत्व आणि वैश्विक विविधतेचा सन्मान करणारा देश असल्याचेही मोदी म्हणाले. भारताच्या विकासाच्या भागीदीरीच्या केंद्रात सन्मान, विविधता, भविष्याचा विचार आणि टिकाऊ विकास असतो, असेही मोदी म्हणाले. विकासाच्या भागीदारीमागे भारतासाठी सर्वात मोठा मौलिक सिद्धांत जर कोणता असेल, तर तो म्हणजे आपल्या भागीदाराचा सन्मान करणे हा. हीच आमची प्रेरणा आहे, असेही मोदी म्हणाले. आम्ही कोणत्याही देशात्या विकासाच्या योजेनेमध्ये कोणत्याही प्रकारची अट ठेवत नाही, याचे हेच कारण असल्याचे ते पुढे म्हणाले.

भारताने कोणत्याही देशाला मदत केल्यास भारतासाठी तो अभिमानाचा विषय नसून ते आम्ही आमचे सौभाग्या समजतो, असेही पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले.

वाचा-

मॉरिशसमध्ये झाले सुप्रीम कोर्टाच्या इमारतीचे उद्घाटन
भारताच्या मदतीने मॉरिशसमध्ये तयारी झालेली सुप्रीम कोर्टाची इमारत म्हणजे दोन्ही देशांमधील मैत्रीचे द्योतक आहे. या कार्यामुळे भारत आणि मॉरिशसमधील मैत्रीचा आणखी एक टप्पा गाठला गेला आहे. पोर्ट लुईमध्ये उभी राहिलेली ही सुप्रीम कोर्टाची इमारत म्हणजे दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्य आणि मूल्यांची निशाणी आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

वाचा:
मॉरिशसने कोविड-१९ विरुद्ध ठोस पावले उचलली आणि यात भारतानेही सहकार्य दिले ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचेही मोदी म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here