महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरचे मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवण्यात येणार आहे. त्यासोबतच भाविक भक्तांना महाप्रसादाचा देखील लाभ घेता येणार आहे. देणगी दर्शन दिवसभर सुरू राहणार असून देणगी दर्शनासाठी आलेल्या भाविकांकरता सुविधांनी युक्त भव्य दर्शन मंडप देखील उभारलेला असेल.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे गर्भ ग्रह, सभामंडप, प्रवेशद्वार, उत्तर आणि पूर्व महाद्वार इत्यादी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे. येणाऱ्या भाविकांची सोय हे नुकत्याच बांधण्यात आलेल्या भव्य दर्शन मंडपातून आणि त्याच्या दोन्ही विंग मधून करण्यात आली आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. तातडीने दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी देणगी दर्शन संपूर्ण दिवसभर सुरू राहील. देणगी दर्शनासाठी आलेल्या भाविकांकरता सर्व सुविधांनी युक्त भव्य दर्शन मंडप बनवण्यात आलेला आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी झाली आहे. मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहील. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान तर्फे भाविकांना गायत्री मंदिराजवळ प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरता गर्भ ग्रह दर्शन बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आली आहे.