कॅनबेरा: घराची सफाई करत असताना एका तरुणाला घरातून एक अशी गोष्ट सापडली जी पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. या तरुणीला घराची सफाई करताना तब्बल ३३ लाख रुपयांहून अधिक किमतीचं नाणं सापडलं. जेव्हा या तरुणीला या नाण्याची खरी किंमत कळाली तेव्हा तिला यावर विश्वासच बसेना. ही मुलगी ज्यांच्या घरी साफसफाई करण्यासाठी आली होती त्या लोकांचा या नाण्यावर हक्क असल्याचं सांगत तिने प्रामाणिकपणे ते त्यांना दिलं. त्यामुळे तिने अनेकांची मनंही जिंकली.

news.com.au च्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये ही घटना घडली आहे. शार्लोट बोसन्क्वेट ही २० वर्षीय तरुणी सिडनीमध्ये राहते. ती साफसफाईचे काम करते. ती टिकटॉकवर व्हिडिओही शेअर करते. शार्लोटने टिकटॉकवर सांगितले की, ती घर साफ करत होती. साफसफाई करण्यासाठी तिने गालिचा उचलताच तिला १९३० चे नाणे सापडले. हे नाणे अत्यंत दुर्मिळ असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्मशानात निक्कीला संपवलं, मग संध्याकाळी लग्न केलं; साहिलने एक-एक करुन सारंच सांगितलं
शार्लोटनेही या नाण्यावर संशोधन केले आहे, या नाण्याची किंमत तब्बल ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते, असे तिचे म्हणणे आहे. या नाण्याच्या स्थितीवर त्याचे मूल्य ठरवले जाईल. हे लाखोंचं नाणं मिळूनही शार्लोटने हे नाणं तिचं नसल्याचं सांगितलं. ज्या घरात हे नाणं सापडलं त्याच्याच कडे याच मालकी राहील, असं तिने सांगितलं.

१९२९ ते १९३९ दरम्यान जेव्हा जगातील अनेक देश आर्थिक संकटाचा सामना करत होते, तेव्हा ऑस्ट्रेलियात १९३० मध्ये अशी १५०० नाणी चलनात आली. यामुळेच शार्लोटला सापडलेले नाणे मौल्यवान मानले जात आहे.

टेम्पोने मागून धडक दिली, दुचाकी गाडीच्या चाकात अडकली अन् अनर्थ घडला
याहू न्यूजनुसार, १९३० चं एक नाणं गेल्या वर्षी लिलावात ५० लाख रुपयांना विकलं गेलं होतं. २०१९ मध्ये, १९३० चे आणखी एक दुर्मिळ नाणे अनपेक्षित किंमतीला विकले गेले. या नाण्याला साडेनऊ कोटींहून अधिक किंमत मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here