बीजिंग : प्रेम हे आंधळं असतं. एखाद्याच्या प्रेमात पडल्यानंतर कोण काय करेल याचा नेम नाही. असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. ही घटना एका दोन मुलं असलेल्या पित्याची आहे. फक्त प्रेम सिद्ध करण्यासाठी या पित्याने थेट आपल्या दोन मुलांना पणाला लावलं. हे प्रकरण इतकं गंभीर आहे की वाचून तुमचा थरकाप उडेल. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू असून चीनच्या या प्रकरणाने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे.

विवाह झाला असतानाही व्यक्तिचे एका मुलीवर प्रेड जडते. त्यानंतर तो तिला खूश करण्यासाठी अनेक प्रयत्न करू लागतो. दोघांमध्येही प्रेम जमतं. रिलेशनशिप सुरू झाल्यानंतर व्यक्तिला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा असते. त्याने तिला लग्नासाठी विचारलं असता मी मुलं असलेल्या पुरुषासोबत विवाह करणार नसल्याचं तिने सांगितलं. यानंतर व्यक्तिने प्रेम मिळवण्यासाठी थेट मुलांच्या जीवाची बाजी लावली.

प्रेमासाठी युगुलाने घर सोडलं, ६ महिने पळून-पळून पैसेही संपले; पोलिसांत सरेंडर केलं पण अडकले…
पित्याने आपल्या दोन्ही मुलांना थेट १५ व्या मजल्यावरून खाली फेकलं. इतक्या उंचावरून पडल्यानंतर दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी एखादा पिता असं करू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी घडलेल्या घटनेमध्ये न्यायालयाने प्रेयसी आणि आरोपी पिता या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Rudraksha Mahotsav : रुद्राक्ष घेण्यासाठी गेले, रुद्राक्षाविनाच परतले; जळगावच्या २ महिलांना मृत्यूनं गाठलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here