Election commission decision on Shivsena | उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामागे कट असल्याच संशय व्यक्त केला. निवडणूक आयोगाने आमच्याकडून पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र घेतली, पण शेवटी जे करायचं तेच केलं.

हायलाइट्स:
- शिंदे गटातील आमदारांनी संजय राऊतांवर टीका केली होती
- संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रसेच्या दावणीला बांधल्याचा आरोप
शिंदे गटातील आमदारांनी उद्धव यांची साथ सोडताना संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रसेच्या दावणीला बांधला होता. यामुळे शिवसेना पक्ष कणाकणाने संपत होता. यासाठी संजय राऊत यांची शरद पवार यांच्याशी असलेली जवळीक कारणीभूत होती, असा आरोप शिंदे गटाच्या नेत्यांकडून वारंवार केला जातो. हाच धागा पकडत भाजपकडून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनाही डिवचण्यात आले आहे. त्यामुळे आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी म्हटले होते की, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आहे. ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. मी पहिल्या दिवसांपासून सांगत होतो की, खरी शिवसेना हीच आहे. कारण शिवसेना विचारांची शिवसेना आहे, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.
देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणेंना निवडणूक आयोगाचा निर्णय आधीच कसा ठाऊक होता; उद्धव ठाकरेंचा सवाल
उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ताशेरे ओढताना या सगळ्याबद्दल संशयही व्यक्त केला. काही दिवासंपूर्वी केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी धनुष्यबाण शिंदे गटाला मिळणार, असे वक्तव्य केले. देवेंद्र फडणवीस यांनीही अशाच धाटणीचे वक्तव्य केले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाची माहिती या दोघांना कशी होती? या सगळ्यामागे कट होता का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.