मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. या निर्णयानंतर शिंदे गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय वर्तुळात या निर्णयाच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली शिवसेनेची ओळख असलेला धनुष्यबाण हिरावला गेल्याने ठाकरे गटाला मोठा फटका बसेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा फारसा फरक पडणार नाही, असे मत शरद पवार यांनी नोंदवले.
ज्या नावाचा अभिमान बाळगत मोठे झाले, ती ओळखच हिरावली; आदित्य ठाकरेंचे डोळे अश्रूंनी डबडबले
केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांचा निकाल दिला आहे. हा निकाल लागल्यावर त्यामध्ये चर्चा करता येत नाही. त्यामुळे जो निर्णय झाला आहे तो स्वीकारून पुढे जायचे असते. पक्षचिन्ह गेल्याचा फारसा परिणाम होत नसतो. मला आठवतंय की, काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी आणि एका गटाचा वाद झाला होता. त्यावेळी काँग्रेस पक्षाची बैलजोडी ही निशाणी गेली होती, काँग्रेसने हात हे चिन्ह घेतले होते. लोकांनी त्या नव्या चिन्हाला मान्यता दिली. शिवसेनेबाबतही लोकं नवं चिन्ह मान्य करतील. त्यामुळे धनुष्यबाण गेल्याने फारसा परिणाम होणार नाही. या सगळ्याची पंधरा दिवस ते महिनाभर चर्चा होईल, त्यानंतर सगळं थंड होईल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. शरद पवार यांनी हे वक्तव्य करुन एकप्रकारे शिंदे गटाकडून सुरु असलेल्या जल्लोषाची आणि विजयोत्सवातील हवाच काढून घेतली आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठाकरेंचा धनुष्यबाण गेला, भाजपने संजय राऊत-शरद पवारांचा फोटो टाकून जखमेवर मीठ चोळलं

मी धनुष्यबाण चोरला नाही, तुम्ही २०१९ साली काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवला: एकनाथ शिंदे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या निवडणूक आयोगाने धनुष्यबाण शिंदे गटाला दिला. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू. तोपर्यंत या चोरांना आनंद साजरा करु द्या, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, जेव्हा ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय लागतो, तेव्हा तो न्याय असतो. पण जेव्हा त्यांच्या विरोधात निर्णय जातो तेव्हा ‘लोकशाही संकटात आहे’ अशा छापाची प्रतिक्रिया दिली जाते. आजच्या निकालाने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी मान्यच केले होते की, धनुष्यबाण गोठवला जाईल. परंतु, त्यांनी २०१९ साली हा धनुष्यबाण काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता. तो मी सोडवला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here