मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला बहाल केल्याने आधीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यात आता ठाकरे गटातील १४ वा खासदारही शिंदे गटात जाणार असल्याची माहिती आहे.

ठाकरे गटातील एका खासदारानं उलट प्रतिज्ञापत्र दिल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे गटातील एका खासदाराने शिंदेंच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे १४ खासदार हा आता शिंदे गटात प्रवेश करणार का अशी चर्चा जोर धरु लागली आहे. निवडणूक आयोगाकडे जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे एकाच दिवसात ठाकरे गटाला दोन मोठे धक्के मिळाले आहेत.

ज्या नावाचा अभिमान बाळगत मोठे झाले, ती ओळखच हिरावली; आदित्य ठाकरेंचे डोळे अश्रूंनी डबडबले
निवडणूक आयोगाकडे २४-२५ लाख कागदपत्र दोन्ही गटांकडून जमा करण्यात आली होती. त्यानुसार, अनेक खासदार, आमदार, शाखाप्रमुख, विभागप्रमुख या सगळ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केली होती. आतापर्यंत ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटात गेले होते. त्यानंतर १३ वे खासदार गजानन किर्तीकर होते. मात्र, आता लोकसभेतील १४ व्या खासदाराने असं प्रतिज्ञापत्र दिलं होतं की ते शिंदे गटाच्या बाजूने आहेत. जेव्हा की ते ठाकरे गटात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हे खासदार गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटातून अलिप्त आहेत, त्याच खासदाराने उद्धव ठाकरे गटाकडून नाही तर शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र दिल्याची माहिती समोर आली आहे.
Uddhav Thackeray: धनुष्यबाण गेला पण उद्धव ठाकरेंचे हौसले बुलंद, म्हणाले, ‘शेवटपर्यंत लढायचं, आता माघार नाही’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here