मुंबई: मुंबईत आपल्या हक्काचं घर घेण्यासाठी प्रॉव्हिडंट फंडात जमा केलेले पैसे लॉकडाऊनमुळे उपासमार होणाऱ्या दीड हजार लोकांच्या रेशनिंगसाठी खर्च करणाऱ्या एका जोडप्याची प्रसिद्ध उद्योगपती यांनी दखल घेतली आहे. गरीबांच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या या जोडप्याला महिंद्रा यांनी ४ लाखाची मदत केली आहे.

फैय्याज शेख आणि मिजगा शेख हे दोघे पती-पत्नी मालाड मालवणी येथे राहतात. मिजगा या अम्बुजवाडी येथील इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. तर फैय्याज हे शाळेचे विश्वस्त असून एका खासगी कॉस्मॅटीक कंपनीत काम करतात. लॉकडाऊनमध्ये नागरिकांची उपसामार होत असल्याने त्यांनी त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडातील ४ लाख रुपये खर्च करून १५०० गरीबांना रेशन भरून दिले. तसेच लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना फी भरता येत नसल्याने त्यांनी विद्यार्थांची तीन महिन्यांची फी सुद्धा माफ केली आहे. मार्चमध्ये सुरू झाल्यापासूनच त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने स्थानिकांना मदत करण्यास सुरुवात केली. चार महिन्यानंतरही त्यांचं हे मानवतावादी कार्य सुरूच राहिलं. विशेष म्हणजे घरासाठी ठेवलेली प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम काढून त्यांनी गरीबांच्या रेशनपाण्याची व्यवस्था केली.

या जोडप्याची कहानी टाइम्स ऑफ इंडियाने छापल्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्याची दखल घेत या जोडप्याला मदतीचा हात दिला. केपीएमजी, टेलिकॉम कंपनी आणि आयटी कंपनीनेही त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. वर्तमानपत्रात आमची बातमी आल्यानंतर रेशनची मागणी वाढू लागली. संपूर्ण मुंबईतून आम्हाला फोन येऊ लागले. आम्हाला कोणताही फोन टाळता आला नाही. प्रत्येकाला रेशन देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्हाला आर्थिक मदत मिळाल्यानंतर आम्ही आणखीनच रेशन आणून लोकांना दिलं, हे कार्य आम्हाला थांबवायचं नाही, असं फैय्याज यांनी सांगितलं. तसेच देणगी दिल्याबद्दल दात्यांचं आभारही त्यांनी मानले.

तर वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणार असल्याचं मिजगा यांनी सांगितलं. आमच्या शाळेतील दहावीतील सहा पैकी पाच विद्यार्थी पास झाले आहेत. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांचे पालक या मुलांना महाविद्यालयात पाठवू शकत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्यांच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही. आम्ही स्वत: त्यांच्या शाळेची फी भरू, असं त्या म्हणाल्या. मिजगा या २०१०पासून मालवणीत बालवाडी चालवत आहेत. झोपडपट्टीतील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यांनी झिल इंग्लिश स्कूलची सुरू केले. या शाळेला अद्याप सरकारची मान्यता मिळालेली नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here