उस्मानाबाद : केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षासंदर्भातील वादावर काल निकाल दिला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेनेतल्या फुटीच्या वेळी उद्धव ठाकरेंच्या बाजूनं उभ्या राहिलेले उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी आयोगाच्या निर्णयावर इंदिरा गांधी यांच्यावेळी काँग्रेसमध्ये काय घडलेलं यासंदर्भातील इतिहास सांगत पुढील दिशा स्पष्ट केली.

इंदिरा गांधी यांना याच पद्धतीनं काँग्रेस पक्षापासून बेदखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना गाय वासरु चिन्ह घेऊन लढावं लागलं होतं. आजच्या सारखी प्रसारमाध्यमं नसताना देखील इंदिरा गांधी यांनी ३५० पेक्षा अधिक खासदार निवडून आणले होते, असं ओमराजे निंबाळकर म्हणाले. इतिहासाची पुनरावृत्ती कायमस्वरुपी होत आहे. त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. लोकांचा मूड काय आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. लोक सार्वत्रिक निवडणुकांची वाट बघत आहेत. आता आपल्या देशात लोकशाही शिल्लक आहे का प्रश्न प्रत्येकानं आपल्या मनाला विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. आयोग ज्या पद्धतीनं निर्णय घेतंय ते पाहता सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मै है देखते है जोर कितना बाजूए कातील मै है, असं म्हणत आम्ही लढाई साठी तयार असल्याचं ओमराजे निंबाळकर म्हणाले.

शिवसेना पक्षचिन्हाचा निर्णय अन् थेट रामायणातील दाखला; राजू शेट्टींच्या फेसबुक पोस्टची जोरदार चर्चा

सामान्य जनता लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न सुरु आहे त्याचा जाब जनता विचारल्याशिवाय राहणार नाही, असं ओमराजे निंबाळकर म्हणाले. उद्या भाजपचे दोन तृतियांश खासदार फुटले तर कमळ चिन्ह आणि पक्ष फुटलेल्या खासदारांना देणार का असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी केला. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, इंदिरा गांधी यांच्या कालखंडातील प्रसंगाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असं ओमराजे निंबाळकर म्हणाले.

सातव्या वेतन आयोगासंदर्भात शिक्षकांची मोठी भूमिका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पाठवला प्रस्ताव

आजचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा अनपेक्षित नाही. २०१४ पासून देशातील कुठलिही स्वायत्त यंत्रणा ही स्वायत्त राहिलेली नाही. निवडणूक आयोगाकडे लाखो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शपथपत्र दिली होती. जरी तुम्ही त्यांना धनुष्य बाण चिन्ह, शिवसेना हे नाव दिलं असलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लोकांच्या मनातील नाव कसं काढणार असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी केला. चिन्ह कुठलंही असलं तरी महाराष्ट्रातील जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावालाच पाहून मतदान करेल, असं कैलास पाटील म्हणाले.

भाजप महिला नेत्याच्या पतीची रेल्वेखाली आत्महत्या, सहा टर्म माजी आमदारावर सुसाईड नोटमध्ये आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here