कच्च्या तेलाच्या आजच्या किमती
१८ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किंमतीबद्दल बोलायचे तर आज कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. WTI क्रूडचे दर २.७४% घसरून ७६.३४ डॉलर प्रति बॅरलवर व्यापार करत असताना ब्रेंट क्रूडच्या किंमतीत देखील २.५१ टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे. सध्या ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $८३.०० वर व्यापार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रात पेट्रोलचा भाव
कच्च्या तेलाच्या दरातील घसरणीचा परिणाम राज्यात दिसून येत आहे. महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमती १.०२ रुपयांनी कमी होऊन १०६.१५ रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर डिझेल ९९ पैशांनी होऊन ९२.६७ रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.
उल्लेखनीय आहे की गेल्या नऊ महिन्यांपासून महागड्या इंधन दारापासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळालेला नाही आहे. २२ मे २०२२ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ रुपये प्रति लिटर तर डिझेलवर ६ रुपये प्रति लीटरने कपात जाहीर केली. अशा प्रकारे त्या दिवशी राष्ट्रीय पातळीवर इंधन दरात अंतिम सुधारणा करण्यात आली होती. मूल्यवर्धित कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यांदीमुळे इंधनाची किंमत राज्यानुसार बदलते, विविध निकषांवर आधारित असतात.
राज्यात कुठे स्वस्त, कुठे महाग इंधन
नवी मुंबई : पेट्रोल ७६.१४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ५४.५९ रुपये प्रति लिटर
पुणे : पेट्रोल १०५.८२ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.३५ रुपये प्रति लिटर
पिंपरी : पेट्रोल १०५.९५ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.४७ रुपये प्रति लिटर
अहमदनगर : पेट्रोल १०५.९५ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.४८ रुपये प्रति लिटर
मुंबई : पेट्रोल १०६.२९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.२९ रुपये प्रति लिटर
नागपूर : पेट्रोल १०६.०२ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.५७ रुपये प्रति लिटर
नाशिक : पेट्रोल १०६.२६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९३.२६ रुपये प्रति लिटर
ठाणे : पेट्रोल १०४.०४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.३६ रुपये प्रति लिटर
कोल्हापूर : पेट्रोल १०६.५६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९३.०९ रुपये प्रति लिटर
अन्य राज्यांची स्थिती
महाराष्ट्र वगळता अनेक राज्यांमध्ये इंधनाचे दर वाढल्याचे दिसत आहे. पंजाबमध्ये पेट्रोल २२ पैशांनी तर डिझेल २३ पैशांनी महागलं असून उत्तर प्रदेशातही पेट्रोल-डिझेलच्या दरात २२ पैशांची वाढ झाली आहे. तसेच तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकातही पेट्रोल डिझेल महाग झालं आहे.