आरोपीच्या मृत्यू विषयी विविध शंका कुशंकांचे पेव फुटले आहे नांदुरा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार नांदुरा पोलिसात दाखल आहे. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी वेदांत कैलास सपकाळ (वय २२ वर्ष, राहणार नायगाव तालुका नांदुरा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी आरोपीच्या शोधात पोलीस असताना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास नायगाव फाटे नजीक बायोडिझेलच्या टाकीत वेदांत कैलास सपकाळ याचा मृतदेह आढळून आला. आता आरोपीचाच मृतदेह आढळून आल्याने वेगवेगळ्या शंका व्यक्त केल्या आहेत.
मृतक वेदांत कैलास सपकाळ हा बायोडिझेल पंपावर चौकीदाराची नोकरी करीत असल्याची माहिती आहे. त्याने आत्महत्या केली, की त्याच्यासोबत घातपात करण्यात आला, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. बायो डिझेल टाकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध आहे का तो अधिकृत आहे किंवा नाही हे देखील प्रश्न पुढे येत आहेत.
३० तासांच्या प्रतीक्षेनंतर बछडा सुखावला आईच्या कुशीत