Maharashtra Politicis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Politicis Crisis) अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळताच शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांचे प्रोफाईल पिक्चर ‘धनुष्यबाण’ केलं आहे.  

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यानंतर स्वत: एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरवरील प्रोफाईल पिक्चर बदलला आहे. त्यांनी प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे या नेत्यांनी ट्विटरवरील प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे.  

 

महत्त्वाच्या बातम्या:

Shiv Sena Party: एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं, निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here