मुंबई : महाराष्ट्रमध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे संपूर्ण राजकारणात उलथापालथ झाली आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेनेचे नाव दिले आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापलेलं पाहायला मिळतं. मात्र एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला लोकशाहीचा आणि लाखो कार्यकर्त्यांचा विजय असं म्हटले आहे. तसेच बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा हा विजय आहे असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

मात्र, उद्धव ठाकरे गटाकडून याला कडकडून विरोध करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांच्या छावणी काही आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या गटाविरुद्ध बंड केल्यानं उद्धव गट आणि शिवसेने गटातील भांडण सुरू झाली. हा तो दिवस होता जून २०२२ चा.

– २४ जून २०२२ रोजी शिवसेनेने बंडखोर आमदारांविरोधात याचिका दाखल केली आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापतींना शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. उपसभापतींनी शिवसेना नेत्यांची भेट घेतली आणि नंतर कायदेशीर मतांसाठी महाराष्ट्राच्या महाधिवक्ता यांचीही भेट घेतली.

धनुष्यबाण आता पुन्हा दिसणार का? संजय राऊतांनी एका वाक्यात उत्तर देत दिला धक्का…
– २५ जून २०२२ रोजी, महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याशी युती करणाऱ्या शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती.

– २६ जून २०२२ रोजी उपसभापतींच्या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यादरम्यान शिवसेनेत अंतर्गत वाद सुरूच होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर १० दिवसांतच उद्धव ठाकरेंनी शिंदे यांना ‘शिवसेना नेते’ पदावरून हटवण्यात आलं, ज्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.

– ३० जूनला मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मदतीने पुन्हा महाराष्ट्राच्या सिंहासनावरती जागा मिळवली आणि त्यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. यावेळी मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं. या दोन्ही नेत्यांचा शपथ विधीही पार पडला.

– नवीन सभापती निवडण्यासाठी आणि शिंदे यांची फ्लोअर टेस्ट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवशी अधिवेशन ३ आणि ४ जुलैला बोलवण्यात आलं. यावेळी ३ जुलै रोजी पहिल्यांदाच भाजपचे आमदार असलेले राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली.

Vande Bharat Express: पुणे-मुंबईतून वंदे भारतसाठी आनंदाची बातमी, ६ दिवसांत प्रवाशांची मोठी संख्या समोर
– ४ जुलैला एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची फ्लोअर टेस्ट जिंकली. त्यांच्या बाजूने १६४ मत पडली तर नऊ सदस्यांच्या सदस्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं होतं. शिंदे यांचा शपथविधी झाला, फ्लोअर टेस्टही पास झाली. यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी कायदेशीर लढाईसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

– ८ जुलैला ‘शिवसेनेचा धनुष्यबाण हा कायद्यानुसारच असेल’ असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी पक्ष आणि भाजपच्या बंडखोरांना मध्यवधी निवडणुका लढण्याचंही हे आव्हान केलं होतं.

– २३ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे कायदेशीर बाबी दाखवत पाच न्यायाधीशांच्या घटनापिठाकडे हा निर्णय पाठवला.

– ८ ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अधिकृत निर्णय होईपर्यंत शिवसेनेचे नाव आणि चिन्ह वापरण्यावर बंदीचे निर्देश दिले.

– १० ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव दिलं.

– १५ नोव्हेंबरला न्यायमूर्ती संजय नरुला यांच्या एकलखंड पीठानं ठाकरेंची याचिका फेटाळून लावली आणि निवडणूक आयोग यावर लवकरच निर्णय देईल असा निर्णय दिला.

– १२ डिसेंबरला दोन्हीही पक्षांच्या वकिलांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्यासाठी आणखी वेळा मागितला.

– १३ डिसेंबरला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.

– १० जानेवारीला एकनाथ शिंदे यांचे वकील महेश जेठमालाने यांनी युक्तिवाद केला शिवसेनेची घटना ज्या प्रकारे २०१८ मध्ये बदलली गेली ते बेकायदेशीर होतं असं दाखवत एकनाथ शिंदे हीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलं.

– १७ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने आदेश देत एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचे अधिकृत नाव आणि बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा धनुष्यबाण हे चिन्ह सोपवलं.

शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here