सिंधुदुर्ग : खासदार संजय राऊत यांनी कालपासून कोकणात असून इथं शिवसेना जागच्या जागी आहे, असं म्हटलं आहे. निवडणूक आयोगातील पोपटरावांनी शिवसेनेची मालकी कुणाकडे द्यायची हे ठरवलं. सकाळी वृत्तपत्रात फोटो पाहिले, जल्लोष करणारे सात चेहरेच होते. त्यात एक अब्दुल्ला नाचत होता. जे शिवसेना सोडून गेलेले आहेत त्यांना घेऊन काल लोक नाचत होते त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. जिथं ठाकरे तिथेच शिवसेना असंही संजय राऊत म्हणाले.


सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. एक पक्ष ५० वर्षांपासून उभा आहे. एक पक्ष घटनेनुसार चालला आहे. त्या पक्षातले आमदार आणि खासदार आमिषाला बळी पडून बाहेर पडले. तो पक्ष त्यांच्या मालकीचा कसा होऊ शकतो, असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. घटना, कायदा, लोकभावना पायदळी तुडवून तुम्ही हा निर्णय दिला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

दोन दिवस फटाक्यांची आतिषबाजी होईल, त्यासाठी किती खोके फटाके वाजवायचे यासाठी त्यांचं बजेट झालं असेल, असं संजय राऊत म्हणाले.

कोणाला काहीही न सांगता २६ वर्षीय तरुण बाहेर पडला; दुसऱ्या दिवशी कुटुंबाच्या कानावर वाईट बातमी

उद्धव ठाकरे यांनी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं आहे. पुढील काळात चिन्ह कुठलं असेल काय असेल ते पक्ष ठरवेल. या देशातील राज्यशकट हे फक्त शिवसेनेला खतम करण्यासाठी वापरलं जात आहे. हे एका भीतीतून करण्यात आलं आहे. हा सरळ सरळ लोकशाहीच्या नावानं चाललेला राजकीय हिंसाचार आहे, असं संजय राऊत म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात काय होईल हे येणारा काळ ठरवेल. निवडणूक घ्या मग काय होते ते समजेल, असं संजय राऊत म्हणाले. जे गेले आहेत ते पुन्हा निवडून येणार नाहीत, ते कोणत्याही सभागृहात दिसणार नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.

लग्नात प्रत्येक नवरीला पैठणी देण्याचा ठराव, ग्रामपंचायतीकडूनच ‘माहेरच्या साडी’ने सन्मान

महाराष्ट्राच्या जनतेत भावनिक वातावरण आणि चीड आणि संतापाचं वातावरण आहे. या चीड आणि संतापातून पश्चिम बंगाल सारखा निकाल लागण्याची शक्यता आहे, असं संजय राऊत म्हणाले.

ही लढाई शिवसेना विरुद्ध मिंधेगट अशी नसून शिवसेना विरुद्ध महाशक्ती अशी लढाई आहे, असं संजय राऊत म्हणाले. आम्ही फिनिक्स पक्षी ज्या प्रमाणे राखेतून झेपावतो, त्या प्रमाणं तडफेनं झेपावणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे हे आमचे सेनापती आहेत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अदानी ग्रुपवर आणखी एक मोठा आरोप; हिंडेनबर्गनंतर आला ‘फोर्ब्स’चा अहवाल, पाहा त्यात काय म्हटलंय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here