खरेदीसाठी एक वेळ मर्यादा सेट करा
जेव्हाही तुम्ही खरेदीला जाल तेव्हा स्वतःसाठी एक वेळ मर्यादा निश्चित करा आणि तिचे काटेकोरपणे पालन करा. यामुळे अनावश्यक वस्तू खरेदी करण्यापासून बचत तर होईलच शिवाय पैशांसोबतच वेळही वाचेल.
खरेदीला छंद बनवू नका
आपल्यापैकी अनेकांना खरेदीचा छंदही असतो, जे टाळले पाहिजे. जेव्हा तुम्हाला खरोखर गरज असेल तेव्हाच खरेदीला जा.
सेकंड हँड वस्तूला प्राधान्य द्या
पैशाची बचत करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्ही सेकंड हँड खरेदी करून तुमच्या गरजा पूर्ण करू शकता.
कॅशबॅक शॉपिंग पोर्टलचा वापर करा
पैसे वाचवण्याचा हा आणखी एक चांगला पर्याय आहे. आजकाल अनेक ॲप्स आणि पोर्टल्स आहेत, जे खरेदीवर कॅशबॅकचा पर्याय देतात. याद्वारे तुमचा खर्च कमी होईल आणि तुमच्या गरजा देखील पूर्ण होतील.
अन्नाची नासाडी टाळा
अन्न कधीही वाया घालवू नये. तसेच प्रत्येक वेळी भूक लागल्यावर बाहेरून जेवण मागवण्याची सवय टाळा. एक छोटासा प्रयत्न तुमच्या पैशाची बचत करू शकतो. तसेच जर तुम्हाला खूप भूक लागली असेल तर तुम्ही अतिरिक्त जेवण एकाच वेळी बनवणे चांगले आहे.
नवीन कार घेणे टाळा
नवीन गाडी तुमच्या बचतीचा एक मोठा भाग वापरते. EMI चे पैसे देखील शेवटी तुमच्या खिशातून जातात. त्यामुळे ६ महिने किंवा एक वर्ष जुनी कार घेणे फायद्याचे ठरेल.
पगारातून छोटी बचत करण्याचा विचार करा
तुमच्या पगाराचा काही भाग वाचवण्याचे ध्येय नेहमी ठेवा. ते पैसे बचत खात्यात किंवा इतरत्र गुंतवा.
आवश्यक खरेदीची यादी तयार करा
तुमच्या गरजेनुसार दर महिन्याला यादी तयार करा आणि मग खरेदीला जा. काही सणासुदीच्या प्रसंगी चांगल्या सवलती किंवा ऑफर्स मिळतात, त्याचा नक्कीच फायदा घ्या.