महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPLमध्ये माजी महिला क्रिकेटपटूंवर जास्त लक्ष दिलं जात आहे. माजी कर्णधार मिताली राजची गुजरात जायंट्स संघाची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर झुलन गोस्वामी ही मुंबई इंडियन्सची मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशिक्षक आहे.
स्मृती मानधनाची आरसीबीच्या कर्णधारपदी नियुक्ती करताना फ्रँचायझीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा म्हणाले, “आमची धाडसी स्मृती, आम्ही तिच्याकडे नेतृत्वाची भूमिका सोपवली आहे. आम्हाला विश्वास आहे की स्मृती आरसीबीला नवीन उंचीवर घेऊन जाईल”, असं प्रथमेश मिश्रा म्हणाले.
BCCI ने WPL चे वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरीयर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स हे पाच संघ भाग घेतील. सर्व सामने मुंबईतील दोन मैदानांवर होणार आहेत. डीवाय पाटील स्टेजियमवर ४ मार्चपासून लीग सुरू होणार आहे. गुजरात आणि मुंबई पहिला सामन्यात भिडतील. अंतिम सामना २६ मार्चला होणार आहे. अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.