मुंबई: मुंबईला करोनाच्या विळख्यातून बाहेर काढायचे असेल तर अहोरात्र रुग्णसेवा देणाऱ्या पालिका रुग्णालयांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याची आवश्यकता असून हीच बाब ध्यानात घेऊन मुंबईच्या महापौर थेट रुग्णालयांत जाऊन स्थितीचा आढावा घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाला अचानक भेट दिल्यानंतर महापौरांनी आज आपला मोर्चा येथील नायर रुग्णालयाकडे वळवला. ( Visits )

वाचा:

सर्वोपचार देणारं मुंबई पालिकेचं सध्या केवळ बाधित रुग्णांसाठी समर्पित रुग्णालय म्हणून सेवा देत आहे. या रुग्णालयाची संपूर्ण टीम करोना विरुद्धच्या लढाईत जोमाने काम करत आहे. या कर्मचाऱ्यांना बळ देतानाच करोना बाधित रुग्णांना धीर देण्याच्या दुहेरी उद्देशाने महापौर रुग्णालयात पोहचल्या. स्वसंरक्षण वेश (पीपीई किट)परिधान करून थेट करोना बाधितांवर उपचार सुरू असणाऱ्या कक्षात जाऊन त्यांनी पाहणी केली. तसेच प्रत्यक्ष करोना बाधितापर्यंत जाऊन वैयक्तिकरीत्या संवाद साधला. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करोना व्यतिरिक्त इतर आजारांबाबतच्या बाह्य सेवा तसेच आपत्कालीन सेवा सुरू करण्यात येत असून त्याचे नियोजन कशा प्रकारे करण्यात येत आहे, याची पाहणीही महापौरांनी केली व संबंधित डॉक्टरांना मार्गदर्शन केले.

वाचा:

मुंबई महानगरपालिकेतर्फे याठिकाणी देण्यात आलेल्या सोयीसुविधेबद्दल आपण समाधानी आहात का?, अशी विचारणा महापौरांनी करोना बाधितांकडे केली असता सर्व जणांनी समाधानी आहोत, असे सांगितले. त्याचप्रमाणे डॉक्टर, परिचारिका आपली नीट काळजी घेत आहेत ना?, अशी विचारणाही महापौरांनी केली. त्यावर रुग्णांकडून सकारात्मक उत्तर मिळाले. जोपर्यंत आपला रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत याठिकाणी आपल्याला उपचार घ्यावे लागणार असल्याचे महापौरांनी रुग्णांना सांगितले. आपण बरे झाल्यानंतर प्लाझ्मा साठी आपले रक्त हवे असल्यास रक्तदानाची तयारी ठेवावी, असे आवाहन यावेळी महापौरांनी रुग्णांना केले. करोनामुक्त झालेल्या एका व्यक्तीच्या रक्तामुळे तीन जणांचे प्राण वाचण्यास मदत होते, असेही महापौरांनी नमूद केले. आपण लवकर बरे होऊन इतरांची सुद्धा काळजी घ्या, असेही महापौर म्हणाल्या.

वाचा:

रुग्णसेवेत कुठेही कुचराई नको

नायर रुग्णालयाच्या भेटीदरम्यान महापौरांनी सर्वप्रथम रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या दालनात डॉक्टरांसोबत चर्चा केली. करोना कक्षाला भेट दिल्यानंतर महापौरांनी कार्यरत कर्मचाऱ्यांची भेट घेऊन आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचना केल्या. रुग्णसेवेमध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये, असे निर्देश उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना महापौरांनी दिले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here