सांगली : दूध व्यवसायातल्या आर्थिक वादातून एका मित्राने आपल्या मित्राचीच निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वाळवा तालुक्यातल्या अहिरवाडी या ठिकाणी घडला आहे. सुरज बाळासाहेब सावंत (वय २५) असं मृत तरुणाचं नाव आहे. तर शरद दुटाळे, असं हत्या करणाऱ्या संशयित मित्राचं नाव आहे. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

वाळवा तालुक्यातल्या अहिरवाडी या ठिकाणी सुरज सावंत आणि शरद दुटाळे येथे हे दोघे मित्र राहत होते. काही वर्षांपूर्वी दोघांनी एकत्रित दुधाचा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय सुरू झाल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक गोष्टीतून वाद सुरू झाले. त्यातून मग दोघांनीही स्वतंत्र दूध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि दोघांनीही गावात दुधाचा स्वतंत्र व्यवसाय देखील सुरू केला.

चिंचवड पोटनिवडणूक : मतदानाला काही दिवस बाकी असताना भाजपला धक्का; कामठे राष्ट्रवादीत जाणार
ज्यामध्ये सुरज सुरज सावंत या तरुणाने दुधाच्या व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आणि त्याची प्रगती ही चांगल्या प्रमाणात झाली. दुसऱ्या बाजूला सुरजचा मित्र शरद दुटाळे याला दूध व्यवसाय उभारी देऊ शकला नाही. काही काळातच शरद याचा दुधाचा व्यवसाय डबघाईला आला. त्यामुळे त्याने आपला दुधाचा व्यवसाय बंद केला. मात्र, आपला व्यवसाय बंद झाला आणि आपल्या मित्राचा व्यवसाय सुरू आहे. तो प्रगती देखील करत आहे ही बाब कुठेतरी शरदच्या मनामध्ये खटकत होती. त्याचा राग देखील त्याला आला होता. मग यातून त्याने जुन्या आर्थिक विषयावरून सुरज याच्यासोबत वाद सुरू केला. गावातल्या मंडळींनी या दोघांमधील हा वाद मिटवून आर्थिक तडजोड केली होती.

पण आपला व्यवसाय बंद झाला आणि आपला मित्राचा व्यवसाय सुरूच आहे याचा राग शरद याच्या मनात खदखदत होता. या रागातून गुरुवारी रात्रीच्या सुमारास शरद याने आपला जीवलग मित्र सुरज याची थेट हत्या केली. सुरज हा घटनेच्या दिवशी सायंकाळी आपल्या दुचाकीवरून गावाजवळच्या असणाऱ्या तुजारपूर या ठिकाणी दूध संकलनासाठी गेला होता.

यावेळी संभाजी पाटील यांच्या गोठ्याजवळ दूध संकलन करत असताना शरद तिथे पोहचला. यावेळी त्याच्या आर्थिक बाबीच्या मुद्द्यावरून त्याने तिथे सुरजसोबत वाद घातला. हा वाद नंतर टोकाला गेला आणि रागाच्या भरात शरदने डोक्यात लोखंडी रॉड टाकून सूरजची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असून या प्रकरणी शरद दुटाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

RCBची मोठी घोषणा! कर्णधारपदाची धुरा मराठमोळ्या स्मृती मानधनाकडे; विराट-फॅफनं ट्वीटद्वारे दिली माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here