पोलीस अधिकाऱ्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजेश नावाच्या व्यक्तीने आपल्याच पत्नीची आणि मुलाची राहत्या घरात हत्या केली. ही हत्या अवैध संबंधांमुळे केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी समोर आणली. ब्रिजेस असं आरोपी पतीचं नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पत्नीचे अवैध संबंध असल्याचा संशय त्याला आला. यावरून त्यांच्यामध्ये अनेकदा वादही झाले. पण अखेर या वादाचा शेवट हत्येनं झाला.
ब्रिजेसचा संशय वारंवार वाढत होता. इतकंच नाही तर त्याला असलेला २ वर्षांचा मुलगा हा आपला नसून त्याला फक्त एक ४ वर्षांचा मुलगा आहे अशीही त्याची समज होती. याच रागात त्याने आपली पत्नी आणि २ वर्षाच्या मुलाची आपल्या ४ वर्षांच्या मुलासमोर हत्या केली.
भाजीच्या चाकूने केली हत्या…
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पत्नी आणि मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी खाकी दाखवली असता आरोपीने आपल्या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीने भाजी कापण्याच्या चाकूने पत्नी आणि मुलाची हत्या केली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ही संपूर्ण घटना ४ वर्षाच्या मुलाने आपल्या डोळ्यांदेखत पाहिली. आपल्या वडिलांनी कशा निर्दयी पद्धतीने आपलाच भाऊ आणि आईला संपवलं, हे या मुलाने पाहिले. त्यामुळे त्याच्या मनावरही याचा घात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेत आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे.