मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, धीरूभाई अंबानी यांनी समाजावर मोठा प्रभाव टाकला असून लाखो लोकांसाठी ते आजही प्रेरणास्थान आहेत. धीरूभाई आणि कोकिलाबेन १९५५ मध्ये लग्नबंधनात अडकले आणि त्यांना मुकेश, अनिल, नीना आणि दीप्ती अशी चार मुले झाली. धीरूभाईंचे मुलगे, मुकेश आणि अनिल नेहमीच चर्चेत असतात, तर त्यांच्या मुली नेहमीच लाइमलाईटपासून दूर असतात. नीना अनेकदा अंबानी कुटुंबाच्या काही कार्यक्रमात झळकल्या असताना दीप्ती फार क्वचितच कॅमेरासमोर आल्या आहेत.

धीरूभाई अंबानी यांची धाकटी मुलगी, दिप्ती साळगावकर यांचे आपल्या दिवंगत वडिलांसोबत खूप खास बंध होते. एक सामान्य मुंबईकर असल्याने लग्न करून गोव्यात स्थायिक होणे त्यांच्यासाठी कठीण होते पण त्यांनी सर्व काही सुंदरपणे हाताळले. अंबानी कुटुंबाच्या खास कार्यक्रमात दीप्ती साळगावकरचे कुटुंब देखील एकत्र दिसते.

अंबानींच्या नव्या पिढीचे रिपोर्ट कार्ड! जाणून घ्या कोणाला फायदा आणि कोणाला तोटा?
दीप्तीच्या लग्नाची रंजक कहाणी
अंबानी आणि साळगावकर कुटुंबाचे अगदी जवळचे नाते होते आणि अनेकदा एकमेकांच्या घरी जात असत, दीप्ती आणि राज उर्फ दत्तराज एकमेकांच्या संपर्कात येणार हे साहजिक होत. दोघे पहिल्या भेटीचं एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेमात पडल्यानंतर, दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली आणि पाच वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर दीप्ती आणि राज ३१ डिसेंबर १९८३ रोजी लग्नगाठ बांधली. त्यानंतर दोघे गोवा येथे स्थायिक झाले.

मुकेश अंबानींचा सगळीकडे बोलबाला! आता मायक्रोसॉफ्ट, Google सीईओंना मागे टाकलं, पाहा असं काय केलं
अंबानी आणि सलगावकर कुटुंब
एकेकाळी धीरूभाई अंबानी मुंबईतील उषा किरण सोसायटीच्या २२ व्या मजल्यावर राहत होते. तर चौदाव्या मजल्यावर व्यापारी वासुदेव साळगावकर आपल्या कुटुंबासह राहायचे. दोन्ही कुटुंबात चांगले संबंध होते. वासुदेव साळगावकर यांचा मुलगा राज हा मुकेश अंबानी सारखाच तर अनिल पेक्षा दोन वर्षांनी मोठा होता. अशा स्थितीत राज साळगावकर आणि मुकेश अंबानी यांच्यात चांगली मैत्री झाली. तर बहीण दीप्ती त्यांच्या प्रेमात पडली.

शिवाजी विद्यापीठाच्या पठ्ठ्याची कमाल! कोण आहे रवी कुमार, मुकेश अंबानींच्या चार पट जास्त घेणार पगार
दीप्ती आणि राज यांची मुले
दीप्ती आणि राज यांना इशिता साळगावकर आणि विक्रम साळगावकर अशी दोन मुले आहेत. दोन्ही मुलांची त्यांचे आजोबा धीरूभाई अंबानी यांच्यासोबत खूप जवळीक होती. विक्रमने व्हार्टन बिझनेस स्कूलमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. तर पत्रकारिता आणि कलेची आवड असलेली इशेता ४ डिसेंबर २०१६ रोजी नीरव मोदीचा धाकटा भाऊ नीशल मोदी याच्याशी विवाहबंधनात अडकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here