नाशिक: सतत भांडणाच्या कारणातून एका व्यक्तीने मायलेकींवर प्राणघातक हल्ला करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार नाशिक रोड भागातील उपनगर परिसरात घडला आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

उपनगर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या गेट समोर संशयित सरजीत झांजोटे उर्फ दिंगिया याने महिला व तिच्या मुलीवर चाकूने सपासप वार करून स्वतःवर देखील चाकूने वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हा सर्व प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

माझ्याशी शरीरसंबंध ठेव अन्यथा…; पुण्यात बंदूक, तलवारीचे फोटो दाखवत विवाहितेवर अत्याचार
दरम्यान, या घटनेत एक ३४ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर याच महिलेच्या सोळा वर्षीय मुलीवर देखील हल्ला करण्यात आला आहे. या मुलीला नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत महिला व तिच्या मुलीवर वार करून स्वतःवर देखील त्याच चाकूने वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रात्री ३ वाजता पोलिसांना फोन, म्हणाला बायको अन् मुलाला संपवलं; पोलीस घरी जाताच पाहिलं भयंकर…
महिला व तिच्या मुलीवर हल्ला करणारा हल्लेखोर इसम आणि जखमी महिला हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून सतत वाद सुरू होते त्यातून हा प्रकार झाल्याचं समजत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here