नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मोठा ड्रामा झाला. दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने बिनबाद १७ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल बाद झाल्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली मैदानात आले. १००वी कसोटी खेळणारा पुजारा शून्यावर बाद झाला तर दुखापतीनंतर संघात परतलेला श्रेयस अय्यर देखील फक्त ४ धावांवर माघारी परतला.

टीम इंडियाचा डाव एका बाजूने गडगडत असताना माजी कर्णधार विराट कोहली मैदानावर ठामपणे उभा होता. त्याने रविंद्र जडेजासोबत भारताचा डाव सावरला. पण जडेजा २६ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाकडून ५०वे षटक मॅथ्यू कुहनेमॅन याने टाकली. या ओव्हरमध्ये विराट कोहली LBW बाद झाला आणि त्याला बाद देण्यावरून मोठा वाद सुरू झालाय.

मुंबई इंडियन्सचे IPL 2023मधील संपूर्ण वेळापत्रक; MI ची नजर विक्रमी सहावे विजेतेपदावर
मॅथ्यूच्या ओव्हरमधील तिसरा चेंडू विराटच्या पॅडला लागला आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी अपिल केली. अंपायर नितिन मेनन यांनी विराटला बाद दिले, या निर्णयावर विराटने रिव्हूय घेतला. कारण त्याला विश्वास होता की चेंडू पहिला बॅटला लागला आहे.

टीव्ही रिप्लेवर स्पष्टपणे दिसत होते की चेंडू बॅट आणि पॅडला एकाच वेळी लागला. मॅथ्यूचा चेंडू विकेटवर जात होता त्यामुळे तिसऱ्या अंपायरने मैदानावरील अंपायर्सचा निर्णय कायम ठेवला आणि विराटला माघारी परतावे लागले. विराटच्या रुपाने भारताला सहावा धक्का बसला. तो वेगाने अर्धशतकाकडे जात होता आणि संयमी फलंदाजी करत होता. विराटने ८४ चेंडूत ४ चौकारांसह ४४ धावा केल्या.

ड्रेसिंग रुममध्ये पोहोचल्यानंतरचा विराटचा राग सर्वांना दिसला. त्याने रागात हात खुर्चीवर मारला. जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये टीव्हीवर विराटच्या बाद दिल्याचा रिप्ले दाखवला जात होता तेव्हा संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघाचे फलंदाजीचे कोच विक्रम राठोड देखील तिसऱ्या अंपायरने दिलेल्या निर्णयाकडे आश्चर्याने पाहत होते.

IPL 2023 Schedule: IPLचे वेळापत्रक जाहीर; गुजरात विरुद्ध चेन्नई पहिली लढत, जाणून घ्या एका क्लिकवर…
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या आहेत. भारताने १३९ धावांवर ७ विकेट गमावल्या होत्या. आता मैदानावर आर अश्विन आणि अक्षर पटेल आहेत. या दोघे टीम इंडियाला २००च्या पुढे घेऊन गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here