amravati crime news, महादेवाच्या यात्रेत सुरू होता धक्कादायक प्रकार; पोलिसांनी धाड टाकली, हाती लागलं मोठं घबाड – two arrested for selling pistols and weapons during the mahashivratri yatra
अमरावतीः महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या श्री क्षेत्र सालबर्डी येथे महाशिवरात्रीनिमित्त मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने येतात. मात्र याच गर्दीचा फायदा घेऊन काही असामाजिक तत्व या ठिकाणी बंदी असलेले शस्त्र विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३० कट्ट्यार, ४९ गुप्ती तसेच ०६ रामपुरी असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
आज दि. १८ फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन मोशी हद्दीत मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल तिर्थक्षेत्र सालवडी येथे महाशिवरात्रीनिमित्त सुरू असलेल्या उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याचे दृष्टीने विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सुध्दा सदर परिसरामध्ये गस्त करून अवैध धंदयांना आळा घालण्याबाबत पोलीस अधिक्षकानी सूचना दिल्या होत्या. त्यावरून आज सालबडी येथे सुरू असलेल्या यात्रेत महाराष्ट्र राज्याच्या सीमेअंतर्गत आरोपी नामे ईश्वरसिंग बावरी, वय २० वर्षे, रा. तळेगांव (श), ता. आष्टी, जि. वर्धा हा अवैधरित्या लोखंडी घातक शस्त्र विक्री करीत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.ठाकरेंनी दावा केला ६ खासदारांचा; मात्र, आयोगाकडे गेले चारच; ‘ते’ दोन खासदार गेले कुठे? मिळालेल्या माहीतीच्या आधारे पथकाने सदर बाबीची शहानिशा करून आरोपी विक्री करित असलेल्या जागेवर धाड टाकली असता आरोपीने विक्रीकरीता साठवुन ठेवलेले लोखंडी ३० कटयार, ४९ गुप्ती तसेच ०६ रामपुरी चाकू तसेच सदर शस्त्र तयार करण्या करिता वापरण्यात येणारे लोखंडी हाथोडे २, ऐरण व लोखंडी कोरणे असा एकुण ३४ हजार रुपयांचाचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
प्रियकराने बोलणे थांबवले, संतापलेल्या तरुणीने आईचा गळाच घोटला, पण सुदैवाने… सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक, अमरावती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तपन कोल्हे, श्रीराम लांबाडे, पोलीस निरिक्षक, पो.स्टे मौशी यांचे नेतृत्वातील संयुक्त पथकामधील पो.उप.नि. संजय शिंदे, मुलचंद भांबुरकर, पोलीस अमलदार सुनिल महात्मे, पुरूषोत्तम यादव, सैय्यद अजमत, उमेश वाकपांजर, मंगेश लकडे, चन्द्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, अमारत केन्द्रे, निलेश खंडारे व चालक संदीप नेहारे व पो.स्टे. मोशी येथील पोलीस अमलदार यांनी केली आहे. पुढील कायदेशिर कार्यवाहीस्तव आरोपीस जप्त मुद्देमालासह मोर्शी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.