Jitendra Divekar joins BJP, रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा; रोहयाचे माजी उपनगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश – ncp leader and former deputy nagaradhyaksha of roha jitendra divekar joined bjp
रायगड : रायगड जिल्हयात राष्ट्रवादीला हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात भाजपाकडून मोठी रणनीती आखण्यात आली आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वी पालीच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा यांनीही यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीला मोठा दणका दिला होता. आता पाठोपाठ रोहयाचे माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी प्रवेश झाल्याने हा राष्ट्रवादीला मोठा हादरा मानला जात आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे एकहाती वर्चस्व आहे हेच वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपाकडून मोठी रणनिती आखण्यात आल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. रोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. १८ फेब्रुवारी) पनवेल येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला हा जबर धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे-शिंदे गट सक्रिय, सोशल मीडियावर केले हे मोठे बदल गेला अनेक दिवसांपासून रोहा नगरपालिकेतील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची रायगड जिल्ह्यात चर्चा सुरू होती. या चर्चेला पूर्णविराम देत अखेर माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जितेंद्र दिवेकर यांचा रोह्यात दांडगा जनसंपर्क आहे. जनतेच्या हाकेला धावणारा माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या उपनगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे आगामी रोहा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दिवेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे रोह्यात भाजपला मोठी ताकद मिळणार आहे.