धुळे: युवराज माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांचे धुळे शहरांमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी चक्क जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून छत्रपती संभाजी महाराज यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. शिवजयंती निमित्ताने धुळे शहरात पवनपुत्र विजय व्यायाम शाळा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शन सोहळ्याचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आताच्या सरकारने आताच्या पुढाऱ्यांनी नुसता शिवाजी महाराजांचा जयजयकार करून चालणार नाही तर, छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार आत्मसाद करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांचे स्मारक हे जिवंत ठेवायचे असेल तर सर्व गडकोठ किल्ल्यांचे संवर्धन केव्हा करणार आहेत? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.

आयोगाच्या निर्णयानंतरची Breaking News; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोट्यवधीचा पक्षनिधी ट्रान्सफर
भारतीय निवडणूक आयोग हे स्वतंत्र आयोग आहे, सर्वांनी त्याचा आदर करावा. ज्यांना चिन्ह व नाव मिळालंय त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. लोकांना काही घेणंदेणं नाही, कोणाला कोणतं चिन्हं मिळालं लोकांना इतकच माहिती आहे. मागील अडीच वर्षात अस्थिर सरकार असल्यामुळे बरीच कामं झाली नाहीत, आता तुम्ही अडीच वर्षात काय करून दाखवणार आहेत, याची लोक वाट पाहत आहेत. चिन्ह मिळून सगळ्या गोष्टी साधू शकत नाही. साधायचेच असेल तर लोकांची सेवा व प्रलंबीत प्रश्न त्यांनी सोडवावे, अशी प्रतिक्रिया संभाजी महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

रामदास आठवले स्पष्टच बोलले; …तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here