पुणे: देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. यामध्ये त्यांनी सहकार परिषदेला हजेरी लावली आहे. त्यानंतर त्यांनी जे डब्ल्यू मेरीयेट हॉटेल मध्ये काश्मीर मध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलींसोबत संवाद साधला आहे. या संवादानंतर पुण्याच्या राजकारणाच्या दृष्टीने एक मोठी घडामोड घडली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांची भेट घेतली आहे. जे डब्ल्यू मेरीयेट हॉटेलमध्ये ही भेट झाली आहे.

कसब्यात भाजपला उमेदवार निवडताना मोठी कसरत करावी लागली होती. याठिकाणी टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी न देता भाजपने माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना रिंगणात उतरवले आहे. या उमेदवारीवरून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आल्याच्या चर्चा आहेत. भाजप नेते धीरज घाटे, गणेश बिडकर यांच्यासह मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक हे देखील कसब्याची पोटनिवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने टिळक कुटुंबीय नाराज होते. या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मनाली जात आहे.

ठाकरेंकडून नाव,चिन्ह गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, शिंदेंना आता…
टिळक-शहा यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. दरम्यान, कसब्यात ब्राम्हण मतदार बहुसंख्य आहे. त्यामुळे कसब्यात उमेदवार निवडताना या गोष्टीचा विचार व्हायला हवा असं म्हणत शैलेश टिळक यांनी आपली नाराजी जाहीररीत्या बोलून दाखवली होती. तर हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना देखील टिळक हे अनुपस्थित होते.

आयोगाच्या निर्णयानंतरची Breaking News; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोट्यवधीचा पक्षनिधी ट्रान्सफर
मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिळक कुटुंबियांशी फोनवरून चर्चा केल्यानंतर ते रासने यांच्या प्रचारात सहभागी झाले होते. त्यानंतर आता स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टिळक यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर टिळकांनी कसब्यात रासने यांच्या विजयाची हमी अमित शहा यांना दिल्याची माहिती आहे.

भाजपला कसब्यातील निवडणूक अवघड असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जवळपास पाच मंत्री पुण्यात ठाण मांडून आहेत. तर पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी हे देखील रासने यांच्या प्रचारासाठी पुण्यात येणार आहेत. त्याच अनुशंघाने अमित शहा यांच्या दौऱ्याला देखील महत्व आले आहे. अमित शहा हे स्वतः प्रचारात उतरणार नसले तरी देखील ते कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात असलेल्या ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. तर आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांची देखील भेट घेणार आहेत. त्यामुळे कसबा पेठ पोटनिवडणूक भाजपने खूपच गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here