अपह्रित मुलीचे वय १७ वर्षे असून, ४ फेब्रुवारी ती अचानक गायब झाली. दुसऱ्या दिवशी ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यात जळगावमधील सात जणांचा सहभाग असल्याची बाब पोलीस चौकशीत निष्पन्न झाली. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. यापैकी तन्वीर अहमद अजीजुद्दीन शेख आणि इस्तियाक अली लियाकत अली यांना पोलिसांनी फेब्रुवारी तसेच मार्च महिन्यात अटक केले होते. परंतु अन्य आरोपी मोबाइल व सिमकार्ड सतत बदलत असत. मोबाइल बंद ठेवून लॉकडाउनचा फायदा घेत अज्ञात स्थळी लपून बसले. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे कठीण झाले होते. परंतु मोबाईल लोकेशनद्वारे पकडले जाण्याची शक्यता असल्याने आरोपी सोशल मीडियाद्वारे संबंधितांशी संपर्क करत असल्याची माहिती पोलिसांना समजली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके या गुन्ह्याचा तपास करत असून, त्यांनी ठाणे सायबर सेलची मदत घेतली. तसेच संबंधित अॅप कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करून संशयिताच्या आयडीद्वारे आरोपींच्या संभावित लोकेशनची माहिती काढली. या माहितीनंतर पोलिसांचे पथक यवतमाळला रवाना झाले. यवतमाळमधील फुलसांगवी गावात अकाउंट आयडी अॅक्टीव्हेट झाल्याने मुंब्रा पोलिसांनी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आरोपींचा शोध घेतला. मुख्य आरोपी आबीद मजीद शेख आणि जावेद मजीद शेख यांना अटक केली. तसेच अपहृत मुलीला ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी सख्खे भाऊ असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. अशाप्रकारे पोलिसांनी मुलीची आरोपींच्या तावडीतून सुखरूप सुटका केली असून, मुलीला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
तीन मोबाइल जप्त
आरोपींनी अन्य ओळखीच्या व्यक्तीकडील मोबाइलमधून अॅप आयडीचा वापर केला असून, त्यांचाही मुंब्रा पोलिसांनी शोध घेतला. याबाबत चौकशी करून मोबाइल आणि आरोपीकडील तीन मोबाइल, तसेच सिमकार्डही जप्त करण्यात आले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.