farmer died to electric shock, पिकाची राखण करायला शेतात गेला, मात्र मध्यरात्री घडलं असं काही की शेतकऱ्याने गमावला जीव – buldhana a 34 years old farmer died to electric shock
बुलढाणाः शेतकरी म्हटलं की एक पाय घरात आणि एक पाय शेतात असतो. किंबहुना घरापेक्षा जास्ती तो आपला वेळ शेतामध्येच घालवत असतो. सध्या शेतीमध्ये अनेक प्रकारच्या कामगिरी सुरू आहे. आणि त्याकरता घरापासूनच आपल्या शेतामध्येच झोपडी वजा घरामध्ये रात्रीच्या वेळेस मुक्काम ठेवावा लागतो. आपल्या शेतातील झोपडीवजा घरात विद्युत व्यवस्थेमुळं एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे संपूर्ण गावात हळ हळ व्यक्त केली जात आहे. (buldhana farmer news)
झोपडीला रात्री लागलेल्या आगीत शेतकऱ्याची झोपडी जळून खाक झाली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याचा सुध्दा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास पिकाची राखण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही माहिती समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोग्य तपासणी केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सांगितली आहे. विशेष म्हणजे पहाटेच्या सुमारात शेतात गेलेल्या शेतकऱ्यांनी ही घटना पाहिल्यानंतर त्यांनी कुटुंबियांना आणि पोलिसांना याची माहिती दिली. शेतामध्ये कोणी नसल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही. नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट काढताय; राज्य सरकारने नियमात केला मोठा बदल, वाचा सविस्तर बुलढाणा जिल्ह्यातील दुधलगाव येथील शेतातील झोपडीत शेतकरी झोपलेला असतांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागून ३४ वर्षीय शेतकऱ्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ही घटना दुधलगाव येथे १६ फेब्रुवारी रोजी घडली आहे. मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथील गणेश विजय नारखेडे वय ३४ वर्षे हा शेतकरी नेहमी प्रमाणे आपल्या शेतात झोपलेला असताना रात्रीच्या सुमारास अचानकपणे मोटरच्या शॉर्टसर्किटमुळे झोपडीला आग लागली. शेतकऱ्याने या आगीतून सुटका करून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. मात्र शॉर्ट सर्किटमुळे संपूर्ण टीनाच्या खोलीला करंट असल्यामुळे त्याचा हात लोखंडी पाइपला लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. शेतामध्ये कोणी नसल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही. त्यामुळे करंट लागून पडलेला तो शेतकरी जळून खाक झाला होता. ही घटना शेतात जाताना इतर शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे.