पुणे: जम्बो कोविड सेंटरसाठी महापालिकेने निधी नाकारल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज जोरदार आंदोलन केलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक रुग्णच महापालिकेत आणला आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा जोरदार निषेध केला. ‘भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पुणेकरांना मरण्यासाठी सोडून दिलं आहे,’ असा घणाघाती आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.

पुणे जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आतापर्यंत ८० हजारच्या पुढं गेली असून १८८५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या ४८,९८४ रुग्णांवर उपचार सुरू असून ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. रोजच्या रोज वाढणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्याचं आव्हान जिल्हा प्रशासनापुढं आहे. जिल्हा प्रशासन शाळा, खासगी रुग्णालये व हॉटेल ताब्यात घेत आहे. उभारण्याचेही जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या कोविड सेंटरसाठी निधी देण्यास पुणे महापालिकेच्या स्थायी समितीनं नकार दिला आहे. याचा निषेध म्हणून मनसेनं आज महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं.

हेही वाचा:

माजी नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक रुग्णच महापालिकेत आणला होता. पुणे महापालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाचा निषेध करणारे फलक मनसे कार्यकर्त्यांच्या हातात होते. करोना रुग्णांसाठी जम्बो आयसोलेशन सेंटर उभारले गेलेच पाहिजे, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. ‘कोविड सेंटरसाठी महापालिका पैसे नाकारत असेल तर महापालिकेचा फंड गेला कुठे? किती रुग्णांवर आतापर्यंत उपचार केले आणि त्यासाठी किती पैसे खर्च झाले?, याचा हिशेब देण्याची मागणी मनसेनं केली. ‘निवडून दिले पुणेकरांनी, चाकरी करतात दिल्लीकरांची… पुणेकरांच्या पैशाची लावलीय लूट… निधी आमच्या हक्काचा, नाही भाजपच्या…’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

हेही वाचा:

‘पुण्यात सध्या असलेल्या कोविड सेंटरची स्थिती खूपच वाईट आहे. ही स्थिती पाहून जीवन नकोसं वाटतं. पुण्याच्या लोकप्रतिनिधींना त्याची लाज राहिलेली नाही. स्वत:चा विकासनिधी भाजपच्या फंडात जमा करून पुणेकरांनी त्यांनी मरण्यासाठी सोडून दिलं आहे,’ अशी टीका मनसे रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केली.

हेही वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here