मोहनचं लग्न केल्यावर त्याचं मन संसारात रमेल आणि आरजूला विसरेल, असा विचार करून त्याच्या कुटुंबीयांनी ३ वर्षांपूर्वी त्याचं लग्न लावलं. लग्नानंतर मोहनला एक मुलगा झाला. मात्र याचा कोणताच परिणाम मोहन आणि आरजूच्या नात्यावर झाला नाही. दोघे संपर्कात होते. त्यांचे प्रेमसंबंधही कायम होते. मोहनच्या पत्नीला याला विरोध होता. यावरून दोघांमध्ये सातत्यानं वाद व्हायचे. दीड वर्षांपूर्वी मोहनची पत्नी मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. पत्नी माहेरी गेल्यानंतर मोहन आणि आरजूच्या भेटीगाठी वाढू लागल्या.
मोहन आणि आरजूचा संपर्क वाढल्यानं कुटुंबीय चिंतेत होतं. मोहनला त्यांच्याकडून सतत बोलणी खावी लागायची. त्यामुळे मोहननं घर सोडलं आणि पनकी परिसरात एक फ्लॅट भाड्यानं घेतला. आरजू अनेकदा या फ्लॅटवर यायची. यानंतर आरजूच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न ठरवलं. २६ फेब्रुवारीला वरात येणार होती. आरजूच्या घरात लग्नाची तयारी सुरू झाली. मात्र आरजू मोहनला विसरायला तयार नव्हती. त्यामुळे १६ फेब्रुवारीला ती मामाच्या घरी जात असल्याचं सांगून मोहनला भेटायला गेली.
मोहनचे कुटुंबीय दिवसभर त्याला फोन करत होते. मात्र त्यानं उत्तर दिलं नाही. कुटुंबीयांनी त्याच्या फ्लॅटवर जाऊन दार ठोठावलं. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पनकी पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. पोलीस फ्लॅटवर पोहोचले, तेव्हा दार आतून बंद होतं. पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना मोहन आणि आरजूचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.