mumbai crime news, ७ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, १७ वर्षीय आरोपीच्या शिक्षेसंदर्भात कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण – 17 year old who raped child repeatedly to be tried as adult for heinous crime
मुंबईः सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर १७ वर्षांच्या मुलाने वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात त्याच्यासोबत अन्यही आरोपी सहभागी आहेत. २०२०मध्ये ही घटना घडली असून आता या प्रकरणी कोर्टात केस सुरू आहे. आरोपींनी पीडितेच्या बहिणीलाही धमकी दिली होती. दरम्यान, आरोपी अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद करण्यात आला होता. तर, सत्र न्यायालयाने मात्र गुन्हा गंभीर होता व गुन्ह्याचे परिणाम आणि स्वरुप समजून घेण्याइतपत आरोपी पौढ होता, असं म्हटलं आहे. तर, पीडितेच्या बहिणीने
मानसिक आरोग्य अहवालात असे दिसून आले आहे की, अल्पवयीन आरोपीने केलेल्या गुन्ह्याचे स्वरुप गंभीर आहे तसेच कायद्याच्या विरुद्ध आहे. आरोपीची मानसिक स्थिती नाजूक असल्याचेही कोणतेही पुरावे सापडले नाहीयेत, असं न्यायालयाने म्हटलं आहे. १६ ते १८ वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलांनी घृणास्पद गुन्हा केल्यास त्यांच्यावर पौढांप्रमाणेच खटला चालवला जाऊ शकतो. पोक्सोअंतर्गंत अशा गुन्ह्यांसाठी जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. किंवा बाल न्याय मंडळांअंतर्गंत बाल सुधारगृहात ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते. पुणेः वडील पाच वर्षांच्या लेकाला घेऊन पाण्यात उतरत होते, अचानक पाय घसरला अन् अनर्थ घडला वैदकीय अधिकाऱ्याने जारी केलेले दोषारोपपत्र, मानसिक आणि शारीरिक आरोग्य अहवाल विचारात घेऊन सत्र न्यायालयाने २०२०मध्ये सात वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी १७ वर्षांच्या आरोपीवर खटला चालवण्यास सांगितले होते. गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे असं निरीक्षण नोंदवून डोंगरीच्या प्रधान दंडाधिकाऱ्यांनी प्रकरण सत्र न्यायालयात वर्ग केले होते.
सत्र न्यायालयाने पीडितेच्या जबाबाचा अभ्यास केला आहे. त्यानुसार, आरोपीने पीडितेवर केवळ लैंगिक अत्याचार केला नाही तर आरोपी पीडितेला धमक्याही दिल्या होत्या. जर तू आली नाहीस तर तुझ्या बहिणीसोबतही असंच कृत्य करु, अशी धमकीही दिली आहे. आरोपी पीडितेला फोन करुन बोलवायचे आणि तिच्यावर अत्याचार करायचे, असं तिने जबाबात म्हटले आहे.