५० हून जणांची हत्या केली
दिल्ली आणि शेजारच्या राज्यांमधील ५० हून अधिक ट्रक आणि टॅक्सी चालकांची हत्या केलीय. शर्मा हा आयुर्वेदिक डॉक्टर आहे. त्याला बपरोला भागातून अटक करण्यात आलीय. पॅरोलमधून पळून जानेवारीपासून तो तेथे रहात होता. हा डॉक्टर १०० हून अधिक घटनांमध्ये सामील असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमध्ये त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. या संबंधी पोलित त्याची चौकशी करत आहेत.
किडनी विकण्याचे रॅकेट चालवायचा
अपहरण आणि हत्येच्या अनेक प्रकरणांमध्ये शर्माला दोषी ठरवण्यात आलं आहे. बनावट गॅस एजन्सी चालवल्याबद्दल त्याला उत्तर प्रदेशात दोनदा अटक करण्यात आली होती. किडनी विकणारी टोळी चालवल्याप्रकरणी अनेक राज्यातीव तुरुंगात त्याची रवानगी झाली होती. ‘पूर्वी तो मोहन गार्डनमध्ये राहत होता आणि तिथून ते बपरोला येथे पळाला. तिथे त्याने एका विधवेशी लग्न केलं आणि मालमत्तेचा व्यवसाय सुरू केला. याची माहिती मिळताच आमच्या मंगळवारी त्याला अटक केली, असं डीसीपी (गुन्हे) राकेश पवेरिया यांनी सांगितलं.
गॅस एजन्सीपासून गुन्हेगारीच्या दलदलीत
बिहारमधील सिवान येथून बीएएमएसची डिग्री मिळवल्यानंतर जयपूरमध्ये त्याने स्वतःचे क्लिनिक उघडले. त्यानंतर १९९२ मध्ये त्याने गॅस डीलरशिप योजनेत ११ लाख रुपयांची गुंतवणूक केली. पण त्यात त्याचे मोठे नुकसान झाले. यानंतर १९९५ मध्ये त्याने अलीगढच्या छारा गावात बनावट गॅस एजन्सी सुरू केली आणि तिथून त्याची गुन्हेगारी सुरू झाली.
२००४ मध्ये इतर डॉक्टरांसोबत अटक
शर्मा आणि त्याचे साथीदार एलपीजी सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक लुटायचे आणि ड्रायव्हरची हत्या करायचे. यानंतर ते ट्रकमधून सिलिंडर उतरवून आपल्या बनावट गॅस एजन्सीत नेत होते. सन १९९४ मध्ये तो किडनी ट्रान्सप्लांटच्या आंतरराज्यीय टोळीत सामील झाला. गुरुग्राम किडनी रॅकेट प्रकरणी २००४ मध्ये इतर डॉक्टरांसोबत त्यालाही अटक करण्यात आली होती, असं डीसीपींनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
A big thank you for your article.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.