कोलकाता: केंद्र सरकार दरवर्षी मिड डे मीलवर कोट्यवधी रुपये खर्च करतं. मात्र त्यातही घोटाळे होतात. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात असाच एक प्रकार समोर आला. एका शाळेत मिड डे मील वाढण्यावरून वाद झाला. मालदा जिल्ह्यातील इंग्लिश बाजार परिसरात असलेल्या अमृत प्राथमिक विद्यालयात ही घटना घडली. शाळेतील शिक्षकांनी चिकनचे लेग पीस स्वत: खाल्ले आणि विद्यार्थ्यांना उरलेलं चिकन दिल्याचा आरोप पालकांनी केला. वाद वाढल्यानंतर पालकांनी शिक्षकांना एका वर्गात कोंडून ठेवलं. या घटनेची सध्या पंचक्रोशीत जोरदार चर्चा आहे.

जिल्हा प्रशासनानं पालकांच्या आरोपांची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. शिक्षकांनी लेग पीस खाल्ले आणि आम्हाला उरलेलं चिकन दिलं, अशी तक्रार सांगत विद्यार्थी घरी गेले. त्यानंतर पालक तातडीनं शाळेत पोहोचले. शिक्षक चिकन करीमधील लेग पीस आणि चांगले तुकडे स्वत: खातात आणि मुलांना उरलेले तुकडे देतात, असा आरोप पालकांनी केला. शाळेत ज्या दिवशी चिकन तयार केलं जातं, त्यावेळी शिक्षक पिकनिक मूडमध्ये असतात आणि स्वत:साठी चांगल्या दर्जाच्या तांदूळ वापरुन स्वयंपाक करतात, असा दावा पालकांनी केला.
जीव देतोय! तरुणाचं ट्विट, पोलिसांकडून रात्रभर पाठलाग; सकाळी कर्जत स्टेशनला पोहोचले तर…
मिड डे मीलमध्ये चिकन करीचा दिवस ठरलेला असतो. शाळेत चिकन करी तयार केलेली असताना विद्यार्थी नाराज होऊन घरी गेले. आम्हाला शाळेत शिल्लक राहिलेलं जेवण दिलं जात असल्याची तक्रार त्यांनी पालकांकडे केली. त्यानंतर पालक शाळेत पोहोचले. पालक आणि शाळेचे कर्मचारी यांच्यात जोरदार वाद झाला. भांडण टोकाला गेलं आणि पालकांनी सहा शिक्षकांना एका वर्गात कोंडून बाहेरुन कुलूप लावलं. जवळपास ४ तास शिक्षकांना कोंडून ठेवण्यात आलं होतं.
कपाळावर कुंकू लावलं, हातात चुडा घातला अन् मृत्यूला कवटाळलं; फ्लॅटमध्ये प्रेमी युगुलाचा अंत
घटनेची माहिती मिळताच पोलीस शाळेत पोहोचले. त्यांनी पालकांची समजूत काढली. शिक्षकांना वर्गाबाहेर काढलं. शिक्षक चांगल्या प्रतीचे तांदूळ आणून भात शिजवतात आणि तो चिकन लेग पीससोबत खात असल्याचा आरोप पालकांनी केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. याबद्दल शिक्षकांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here