मुंबई: पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यानं उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला आहे. निवडणूक आयोगानं शिंदे गटाच्या बाजूनं निर्णय दिला. त्यामुळे आता शिवसेना ठाकरेंच्या हातून गेली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूनं गेल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानं यापुढे ठाकरे गटातून जोरदार आऊटगोईंग होऊ शकतं. याचा थेट फायदा शिंदेंना होईल. कुंपणावरील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदेंकडे जाऊ शकतात. त्यामुळे ठाकरे गटासाठी कसोटीचा काळ सुरुच आहे.

तब्बल ४० आमदार शिंदेंसोबत गेल्यानं ठाकरे अडचणीत आले. आता नाव आणि चिन्ह मिळाल्यानं ठाकरेंच्या अडचणींत भर पडली आहे. विधानसभेत शिंदेंनी व्हिप काढल्यास ठाकरे गटाच्या आमदारांना त्यानुसार कार्यवाही करावी लागेल. सरकारच्या बाजूनं मतदान करावं लागेल. या आमदारांमध्ये उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरेंचादेखील समावेश आहे. धनुष्यबाण गेला पण ठाकरे ब्रँडचा करिष्मा कायम; चवताळलेला ज्येष्ठ शिवसैनिक CM शिंदेंना म्हणाला….
विधानसभेत विधेयकांवर मतदान होत असताना पक्षाकडून आपल्या आमदारांना व्हिप बजावला जातो. हा व्हिपचं उल्लंघन केल्यास आमदार अपात्र ठरू शकतात. व्हिप धुडकावणाऱ्या आमदारांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार विधासभा/विधानपरिषदेच्या अध्यक्षांना असतात. शिवसेना हे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून काढण्यात आलेला व्हिप आदित्य यांच्यासह ठाकरे गटातील १५ आमदारांसाठी बंधनकारक असेल.

राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. शिंदे गटानं काढलेल्या व्हिपचं उल्लंघन केल्यास नार्वेकर ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारु शकतात. नार्वेकर जुलै २०१६ मध्ये अध्यक्ष झाले. ठाकरे गटातील आदित्य वगळता इतर सर्व आमदारांचं निलंबन करण्याची मागणी याआधी शिंदे गटाकडून करण्यात आली होती.
शिवसेना नाव आणि चिन्हासाठी २ हजार कोटींचा व्यवहार; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
विधेयकाच्या बाजूनं मतदान करण्यासाठी शिंदेंकडून व्हिप काढण्यास आल्यास आता ठाकरे गटाकडे केवळ दोन पर्याय आहेत. त्यांना राजीनामे देऊन पुन्हा निवडून यावं लागेल. तर दुसरा पर्याय अनुपस्थित राहण्याचा असेल. आपण अधिवेशनाला अनुपस्थित राहत असल्याचं त्यांना आधीच कळवावं लागेल. त्यासाठी कारण द्यावं लागेल. अशा परिस्थितीत ठाकरे गटातील आमदारांना त्यांचं विधानसभा सदस्यत्व टिकवता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here