त्याचवेळी, २५००० धावांचा आकडा ५०+ च्या सरासरीने गाठणारा विराट जगातील पहिला खेळाडू आहे. विराट आणि सचिनपाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग (५८८), आफ्रिकेच्या जॅक कॅलिस (५९४), श्रीलंकेच्या कुमार संगकारा (६०८) आणि महेला जयवर्धने (७०१) सामन्यात २५ हजार धावांचा पल्ला गाठला होता आहेत. या दिग्गजांच्या पंक्तीत विराट कोहली जाऊन बसलाय. केवळ ५४९ सामन्यांत २५ धावा करण्याचा विक्रम विराटने आपल्या नावे केलाय.
नागपूरप्रमाणेच भारताने दिल्ली कसोटीही अवघ्या ३ दिवसांत जिंकली. भारताला जिंकण्यासाठी ११५धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे टीम इंडियाने ४ विकेट्स गमावून पूर्ण केले. चेतेश्वर पुजाराने आपली १०० वी कसोटी संस्मरणीय केली. त्याने नाबाद ३१ धावा केल्या. या विजयासह भारताने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या डावात २० चेंडूत तडकाफडकी ३१ धावा केल्या. पुजारासाठी रोहित धावबाद झाला. केएल राहुल केवळ एक धाव काढून तंबूत परतला. रविवारी तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात केवळ ११३ धावाच करू शकला. त्यामुळे भारताला केवळ ११५ धावांचे लक्ष्य मिळाले. कांगारू संघाला पहिल्या डावात एक धावांची आघाडी मिळाली. डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजाने कांगारुंची बोलती बंद करत ७ बळी घेतले. त्याला ऑफस्पिनर आर अश्विननेही चांगली साथ देत ३ बळी टिपले.