मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२३ चे वेळापत्रक जाहीर झालं आहे. जगातील सर्वात मोठी टी ट्वेन्टी लीग असलेली आयपीएल स्पर्धा ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. ५ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबईचं नेतृत्व करेल. कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवणाऱ्या गौतम गंभीरने आयपीएलमधील हिटमॅन आणि मुंबई संघाला प्रतिस्पर्धी इतर संघ किती घाबरतात हे हे पहिल्यांदाच सांगितलं आहे.

राजधानी नवी दिल्लीत बॉर्डर-गावस्कर करंडकातील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सामना पार पडला. या सामन्यात समालोचन पॅनेलचा भाग असलेल्या गौतम गंभीरला एका सहकारी समालोचकाने आयपीएलशी संबंधित विविध मुद्यांवर प्रश्न विचारले. कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधार असताना तुम्हाला कोणत्या दोन खेळाडूंचा संघात समावेश करायचा होता? या प्रश्नाला उत्तर देताना गंभीरने रोहित शर्माचं महत्त्व अधोरेखित केलं.

प्रश्न अवघड असला तरी त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. जर मी कोणत्या २ खेळाडूंना संघात घेऊ इच्छित होतो तर रोहित शर्मा आणि युवराज सिंग होते.
त्यांच्या संघातल्या एन्ट्रीने आमचा संघ मजबूत झाला असता असे मी म्हणत नाही, पण रोहित आणि युवराज केकेआरमध्ये असते तर आम्ही आणखी ट्रॉफी जिंकू शकलो असतो. आम्ही युवराज सिंगला आमच्या संघात सामील करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते शक्य होऊ शकलं नाही.

विक्रमादित्य विराट…. अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज!
मला आयपीएलमध्ये फक्त एका कर्णधाराची भीती वाटत होती, तो म्हणजे रोहित शर्मा. त्याच्यामुळे कित्येक रात्रींची झोप उडाली. रोहित व्यतिरिक्त, मला इतर कोणासाठीही योजना करण्याची, प्लॅन आखण्याची गरज नव्हती किंवा मी इतर कोणासाठीही असा विचार केला नव्हता. पण रोहितविरुद्ध खेळताना मला नेहमी प्लॅन करावा लागे. बोलर्सला विशेष सूचना द्याव्या लागत.

नागपूरप्रमाणेच भारतीय संघाने दिल्ली टेस्टही केवळ ३ दिवसांत जिंकली आहे. भारतीय संघाला जिंकण्यासाठी फक्त ११५ धावांचं लक्ष्य मिळालं होतं. भारताने हे लक्ष्य ४ विकेट्स गमावून पूर्ण केलं. पुजाराने आपली १०० वी कसोटी संस्मरणीय केली. त्याने नाबाद ३१ धावा केल्या. दिल्ली कसोटीतील विजय मिळवून भारताने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here