महागाई भत्त्यात ४ टक्क्यांच्या वाढीची शक्यता
महागाई किती वाढली आहे हे पाहून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्यात येत असते. महागाई जितकी जास्त तितका DA वाढतो. ही उद्योगक्षेत्रातील कामगारांसाठी (CPI-IW) किरकोळ महागाई आहे. उद्योगक्षेत्रातील कामगारांच्या किरकोळ महागाईचा विचार करता यावेळी डीए ४.२३ टक्क्यांनी वाढला पाहिजे. ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, सरकार दशांश बिंदूनंतरच्या संख्येकडे दुर्लक्ष करते. अशा स्थितीत यावेळी डीएमध्ये ४ टक्के वाढ होऊ शकते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ३८ टक्के आहे. ४ टक्क्यांच्या वाढीनंतर ते ४२ टक्के होईल.
किती वाढू शकतो पगार?
जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन सध्या १८,००० रुपये प्रति महिना असेल, तर ३८% DA नुसार त्याला ६,८४० रुपये महागाई भत्ता मिळत आहे. यावेळी महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढू शकतो. १८,००० रुपयांच्या मूळ पगारावर ते ७० रुपये होईल. अशाप्रकारे, डीए वाढल्यानंतर, १८,००० रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला ७,५६० रुपये महागाई भत्ता मिळेल.
समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार १८,००० रुपये प्रति महिना आहे.
मासिक महागाई भत्ता सध्याच्या ३८% दराने: १८००० x ३८/१०० = ६,८४०
३८% च्या वर्तमान दराने वार्षिक महागाई भत्ता: ६,८४० x १२ = ८२,०८०
DA वाढीनंतर मासिक महागाई भत्ता: १८००० x ४२ / १०० = ७५६०
DA वाढीनंतर वार्षिक DA: ७५६०x १२ = ९०,७२०