नवी मुंबई : नवी मुंबई मधील वाशी गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या आयुष्याची अखेर केली. तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. निलेश सत्यवान सर्वेदे (वय ३५ वर्ष) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून निलेशने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार वाशी पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे.

नवी मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. नवी मुंबई शहराला अनेक उपक्रमाअंतर्गत वेगेवगळ्या क्रमांकाचे बक्षिसे मिळवलेली आहेत. मात्र अत्याचार आणि आत्महत्या च्या बाबत शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून देखील काही फरक पडलेला दिसत नाही.

निलेश सर्वेदे हा वाशी गावातील एका इमारतीत भाड्याच्या खोलीत पुतण्यासोबत राहत होता. तसेच तो हाऊसकिपिंगचे काम करत होता. शुक्रवारी सकाळी निलेशचा पुतण्या घराच्या बाहेर गेला होता. यावेळी निलेश घरामध्ये एकटाच होता. याच संधीचा फायदा घेत त्याने आयुष्य संपवलं.

मानखुर्द येथे राहणारा निलेशचा भाऊ दिनेश हा त्याच्या मोबाईलवर सतत कॉल करत होता. मात्र तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे संशयावरून दिनेश वाशी गाव येथे त्याला पाहण्यासाठी आला असता, निलेश घरातील किचनमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

लेकासोबत जावयाकडे जाताना खड्ड्यांनी जीव घेतला, ट्रकखाली चिरडून माऊलीचा करुण अंत
याबाबतची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह रुग्णालयात पाठवून दिला. यावेळी पोलिसांना निलेशने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली असून त्यात त्याने त्याच्या सोबत राहण्यास असलेल्या व त्याला सोडून गेलेल्या महिलेचा उल्लेख केला आहे. त्यामुळे निलेशने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

वाशी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच या बाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

भाजप महिला नेत्याच्या पतीची रेल्वेखाली आत्महत्या, सहा टर्म माजी आमदारावर सुसाईड नोटमध्ये आरोप
शहरामध्ये दिवसेंदिवस प्रेमप्रकारणामधून होणाऱ्या आत्महत्या, बलात्कार ह्या घटना कधी थांबणार? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची काम करण्याची पद्धत पाहता नवी मुंबईतील गुन्हेगारी क्षेत्राला आळा बसेल असा विश्वास नवी मुंबईची जनता व्यक्त करत आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोरांना ताकद देण्याचं काम भाजपकडून केलं जातंय | सुनील शेळके

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here