कोल्हापूर: निवासी उपजिल्हाधिकारी, शहरातील सहा नामांकित डॉक्टर, पोलीस निरीक्षक, उपचार कक्षातील तीन यांच्यासह दोन दिवसांत तब्बल हजारावर लोकांना करोनाची बाधा झाली. केवळ तीस दिवसांत बाधितांचा आकडा सहा हजारावर गेल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ( )

वाचा:

कोल्हापूर जिल्ह्यात जून अखेरपर्यंत केवळ ११८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. यामुळे हा जिल्हा करोना संसर्गाच्या बाबतीत सुरक्षित असल्याचे मानले जात होते. पण एक जुलैपासून बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली. रोज दोनशे ते तीनशे जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येऊ लागला. त्यानंतर हा आकडा चारशे ते पाचशेपर्यंत गेला. दोन दिवसापूर्वी पाच हजारापर्यंत पोहोचलेला आकडा गुरुवारी सहा हजारावर गेला. यामुळे तीस दिवसात करोना बाधितांची संख्या सहा हजारावर पोहोचली असून जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाचा:

घरात राहा, सुरक्षित राहा असे सांगत अधिक कडक केल्यानंतरही लोक अनावश्यक गर्दी करत असल्याने करोना बाधितांची संख्या वाढत आहे. दोन दिवसात निवासी उपजिल्हाधिकारी, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील तीन डॉक्टर, पोलीस निरीक्षक यांच्यासह अनेकजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. याचा धसका लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी घेतला आहे. एका आमदारापाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ‘नो व्हिजिटर्स’ असा फलक दारावर लावला आहे.

उपचारासाठी हॉटेल्सही ताब्यात घेणार

जिल्ह्यात आतापर्यंत १६५ पेक्षा अधिक करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत तीनशेपेक्षा अधिक बाधित आढळले. यामुळे बाधितांचा आकडा सहा हजारावर पोहोचला. उपचारासाठी बेड कमी पडत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. उपचारासाठी आता मंगल कार्यालये, खासगी दवाखाने याबरोबरच काही हॉटेल्स देखील घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here