अकोला : अकोला शहरातील डाबकी रोड भागात काल रात्रीच्या सुमारास ३५ वर्षीय एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. संदीप तायडे (रा. गजानन नगर गल्ली क्रमांक नऊ, डाबकी रोड) असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. सद्यस्थितीत संदीपचा अपघात झाला? की संदीपचा घातपात झाला? याबाबत चर्चा सुरु आहे.

दरम्यान, डाबकी रोड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये संदीपसोबत ४ जणांनी वाद घातल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आता पोलीस संदीपच्या वैद्यकीय तपासणी अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

घायाळ ठाकरेंनी रणशिंग फुंकलं; अमित शहांचा शत्रू क्रमांक एक म्हणून उल्लेख; शिंदेंवरही हल्ला
काय आहे संपूर्ण घटना?

अकोला शहरातील डाबकी रोड भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठलं आणि मृतदेहाची तपासणी केली असता, त्याची ओळख पटली. डाबकी रोड भागातील गजानन नगरातील संदीप तायडे याचा हा मृतदेह असल्याचं निष्पन्न झालं. त्यावेळी संदीपच्या अंगावर कुठल्या प्रकारच्या मारहाण केल्याच्या खुणा तसेच जखमा नव्हत्या.

त्याचा अपघाती मृत्यू झाला असावा, असा पोलिसांना संशय होता. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता, संदीपसोबत चार अज्ञात लोकांनी वाद घातला आणि त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे सीसीटीव्हीमध्ये निदर्शनास येत आहे. दरम्यान, पोलिसांनी रात्रीच त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केला असून सकाळी ९ वाजता त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे पोलीस आता वैद्यकीय तपासणीच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

सद्यस्थितीत डाबकी रोड पोलीस ठाण्यात संदीपच्या मृत्यू प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. दरम्यान, संदीप तायडे याला दारूचं व्यसन होतं. तो दररोज दारूच्या नशेत असायचा. काल रात्रीही तो दारू पिलेला होता. काल रात्री संदीप रस्त्यावर उभा असताना अचानक त्याच्याजवळ चार अज्ञात लोक आले आणि त्याच्यासोबत वाद घातला अन् रस्त्याच्या साईडला घेऊन गेले. तिथे त्याला मारहाण केली. त्यामुळे पोलिसांनी आता हत्येच्या दिशेनेही तपास सुरु केल्याचे समजते.

आधी म्हणाले उद्धव ठाकरेंसोबतच राहणार, पण शिंदे कोल्हापुरात येताच स्वागताला पोहोचले अन् पक्षप्रवेशही करुन टाकला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here