नवी दिल्ली : पाकिस्तान काही दिवसांपासून कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करीत आहे. आता पुन्हा पाकिस्तानात रोजगाराची मोठी अडचण निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यात पाकिस्तानातील मोठ्या कंपन्यांनी कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे तसेच पाकिस्तानी चलनाच्या घसरणीमुळे आपले कामकाज थांबवले होते. ज्यामुळे आधीच अडचणीत असलेली पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसमोर आणखी संकट वाढले आहे.अनेक मोठ्या कंपन्यांनी आपले कामकाज थांबवण्याची घोषणा केली आहे.

Pakistan Crisis: कर्जासाठी पाकिस्तान काहीही करायला तयार, आता नागरिकांवर लादला नवीन कर
सुझूकी मोटरकॉर्पचे युनिट बंद
ब्लुमर्गच्या एका रिपोर्टच्या मते, सुझूकी मोटरकॉर्पच्या स्थानिक युनिटने आपला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट २ फेब्रुवारीपर्यंत बंद केला होता. कंपनीने आपल्या नियामक फायलिंगमध्ये म्हटले होते की, कच्चा मालाच्या किंवा सुट्या पार्ट्सच्या कमतरतेमुळे कामकाज बंद करण्यात आले. दरम्यान, टायर आणि ट्यूब बनवणाऱ्या घनधारा टायर अँड रबर कंपनीने कच्च्या मालाच्या आयातीत मोठ्या अडचणींमुळे १३ फेब्रुवारी रोजी आपले कामकाज बंद केले. सध्या पाकिस्तानची परकीय गंगाजळी जवळपास रिकामी झाली आहे. पाकिस्तानकडे मालाची आयात करण्यासाठी रोखीची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे.

Pakistan Inflation: पाकिस्तानमध्ये एक लीटर पेट्रोल २७२ रुपये, मटन २००० रुपये किलो, एक अंड ३० रुपयांना
पाकिस्तानात प्रचंड महागाई
महागाईमुळे पाकिस्तानमध्ये अनेक गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. दरम्यान, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्याने प्रचंड बेरोजगारी निर्माण होण्याची शक्यता आहे. आरिफ हबीब लिमिटेडचे संशोधन आणि गुंतवणूक प्रमुख ताहिर अब्बास यांच्या म्हणण्यानुसार, “बड्या कंपन्यांच्या कामकाज बंदमुळे आर्थिक वाढीसह देशातील बेरोजगारीची पातळी वाढेल. लिस्टेड कंपन्यांमध्ये असे बंद कधीच पाहिले नाही.”

Career Story: पाकिस्तानात हिंदू मुलीने रचला इतिहास, डॉ. सना गुलवानीच्या करिअरबद्दल जाणून घ्या
पाकिस्तान ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, मोठ्या कार कंपनीच्या युनिट्स बंद झाल्यामुळे पाकिस्तानमधील कार विक्रीवर परिणाम झाला आहे. याशिवाय अनेक औषध कंपन्यांनी पाकिस्तानच्या औषध नियामक प्राधिकरणाला कळवले आहे की कच्चा माल न मिळाल्याने ते उत्पादन थांबवणार आहेत. तसेच प्राधिकरणाला भाव वाढविण्याची विनंती केली.

पाकिस्तान दिवाळखोरीत – संरक्षण मंत्री
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नुकतेच सांगितले की, देश आधीच दिवाळखोर झाला आहे. सध्याच्या आर्थिक संकटासाठी त्यांनी लष्कर, नोकरशाही आणि राजकीय नेत्यांना जबाबदार धरले. सियालकोट येथील एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, पाकिस्तानला स्वत:ला स्थिर करण्यासाठी स्वत:च्या पायावर उभे राहण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here