दिल्ली: टीम इंडियाने दिल्ली कसोटी जिंकत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये २-० अशी आघाडी मिळवली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील हा दुसरा कसोटी सामना सुरुवातीला चंगळच चुरशीचा होत असल्याचे पाहायला मिळाले. कांगारू संघाने अहिल्या डावात २६३ धावांचे मोठे लक्ष्य भारताला दिले होते. त्याच्या प्रत्युत्तरात भारताने २६२ धावा करत १ धावेची लीड मिळवली होती. तर दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली होती. याबाबतच भारताच्या कर्णधाराने एक वक्तव्य केले आहे.

डेव्हिड वॉर्नर संघाबाहेर झाल्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन डावाची सलामी देण्यासाठी उस्मान ख्वाजासोबत आलेल्या ट्रॅव्हिस हेडचा काउंतर अटॅक टेन्शन देणारा असल्याची कबुली भारतीय कर्णधार रोहित शर्माने दिली आहे. दुसरी कसोटी जिंकल्यानंतर रोहित म्हणाला, ‘काल त्याने १२ षटकांत एका विकेटसाठी ६१ धावा केल्या, जे प्रति षटक पाच धावा करण्पेयाक्षा जास्त होते. आम्ही थोडे घाबरलो होतो आणि आम्ही काही वेळा फिल्डींग बदलण्याचा प्रयत्न करत होतो. सकाळी मला या तीन फिरकीपटूंना सयंम ठेवायला सांगत होतो. आम्ही वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करण्याची गरज नाही. आपण चांगली गोलंदाजी करू आणि फलंदाजाला चुका करू देऊ.’

मोठी बातमी! WTC फायनलमधून हा संघ पडला बाहेर, भारतासमोर बलाढ्य संघांचे आव्हान
केएल राहुलबद्दल काय म्हणाला कर्णधार

सध्या फॉर्मात नसलेला सलामीवीर केएल राहुलबद्दल रोहित म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही अशा खेळपट्ट्यांवर खेळत असता तेव्हा तुम्हाला धावा काढण्याचा मार्ग शोधावा लागतो. एखादा खेळाडू कसा धावा करतो यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन धावा काढणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फलंदाजीची बरीच चर्चा होत आहे. पण टीम मॅनेजमेंट म्हणून आम्ही फक्त केएलच नाही तर प्रत्येक खेळाडूची क्षमता पाहतो. एखादा खेळाडू सक्षम असेल तर त्याला अधिक संधी मिळतात.’

पॅट कमिन्सने उणीव सांगितली

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना त्यांच्या संघाने ३०० पेक्षा जास्त धावा करायला हव्या होत्या. तो म्हणाला, ‘या पिचकडे वळून पाहताना ३०० धावा करणे विलक्षण ठरले असते.’ एका सत्रात नऊ विकेट्स गमावल्याबद्दल निराशा व्यक्त करताना तो म्हणाला, “हे निराशाजनक आहे. या सामन्यातही आम्ही नागपूरच्या दुसऱ्या डावासारखीच पुनरावृत्ती केली.’

BCCIने केली टीम इंडियाची घोषणा! उर्वरित दोन कसोटीसाठी भारताचा दमदार गोलंदाज संघात परतला
राहुल द्रविड म्हणाले,

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले- ‘रोहित त्या खेळाडूंपैकी एक आहे जो दीर्घकाळ संघात आहे. असे लोक आहेत जे फारसे बोलत नाहीत, परंतु जेव्हा ते बोलतात तेव्हा प्रत्येकजण ऐकतो. तो ड्रेसिंग रूम आणि खेळाडूंची खूप काळजी घेतो. आम्ही खूप भाग्यवान आहोत की रोहितने विराट कोहलीसारख्या व्यक्तीकडून नेतृत्व स्वीकारले.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here