जालनाः भावी वधूचा बोहल्यावर चढण्यापुर्वीच भावी पतीने गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना परवा शनिवारी(दि. १८) रोजी जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातील बेलोरा येथे घडली होती. तर सुशील पवार असे आरोपी वराचे नाव आहे. ही घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला असून अत्याचाराला विरोध केल्यानेच आरोपीने भावी वधूचा चाकूने गळा चिरुन खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
जालना जिल्ह्यातील एका तरुणीचा बोहल्यावर चढण्याआधीच तिच्या भावी पतीने गळा कापून निर्घृण खून केल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मयत मुलगी ही अल्पवयीन असून तिचे वय १७ वर्षे ५ महिने असल्याची बाब पुढे आली आहे. बस्ता बांधण्यासाठी वधू आणि वराकडील मंडळी सिंदखेडराजा तालुक्यातील बीड येथे गेली होती. यावेळी वर आणि वधू कडील मंडळी उपस्थित होती. भावी वर देखील बस्ता बांधण्यासाठी येणार होता, मात्र तो तेथून अचानक गायब झाला आणि बेलोरा येथे पोहचला. फेब्रुवारीतच बसणार उन्हाचे चटके, ‘या’ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता तरुणी घरात एकटीच असल्याचे पाहून त्याने तिच्यावर अत्याचार ही केला. यावेळी दोघांमध्ये वाद झाल्याने आरोपी सुशील पवार याने तिचा गळा चिरुन खून केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती घरातील लहान मुलांनी ग्रामस्थांना सांगितल्यानंतर ग्रामस्थ तिथे गोळा झाले आणि आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
ठाकरेंनंतर शिंदे गटही सर्वोच्च न्यायालयात; कॅव्हेट दाखल, बाजू ऐकून घेण्याची केली विनंती लग्न ठरत असताना करताना तरुणीच्या वडिलांकडून आरोपीचे वडील सुभाष पवार, भाऊ अमोल पवार यांनी रोख दीड लाख रुपये आणि वरासाठी २५ हजारांची सोन्याची अंगठी घेतल्याची माहितीही समोर आली आहे. याप्रकरणी सेवली पोलीस ठाण्यात आरोपी नराधम सुशील पवार याच्याविरुद्ध बलात्कार, खून आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अजूनही फरार आहे. तर आरोपीचे वडील आणि भाऊ या दोघांविरुद्ध लग्नासाठी पैसे घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आणखी हुंडा प्रतिबंधक कायद्याचे कलम वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून पोलीस आता आरोपीच्या शोधात आहेत.