गोंदिया : महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीअंतर्गत आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास १० ते १२च्या संख्येत असलेल्या महिला पुरुष नक्षल्यांच्या टोळीने विनाशस्त्र चहा पिण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांना ठार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून जंगलात सर्चिंग सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह आणि ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह दुचाकीने चहा पिण्यासाठी पोलीस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर असलेल्या ढाब्याकडे गेले होते. मात्र, आधीच त्या परिसरात दबा धरुन बसलेल्या काही नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिसरा पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. जखमी शिपायामुळेच सदर घटना पोलिसांना कळल्याचे वृत्त आहे. नक्षल्यांनी त्यांच्या दुचाकीला आग लावून घटनास्थळावरुन बोपारा केला.

Chinchwad Bypoll: आंबेडकरांच्या एन्ट्रीने चिंचवडचं समीकरण बदललं; वंचितची भूमिका अश्विनी जगतापांच्या पथ्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here