मुंबई : महाराष्ट्र-गोंदिया (Maharashtra- Gondiya) छत्तीसगडमधील (Chattisgarh) सुकमा जिल्ह्यात पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात (Naxal Attack) दोन पोलीस शहीद झाले आहेत. तर  एक  पोलीस कर्मचारी  जखमी आहे.  ही घटना महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर  हल्ला झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शहीद झालेले दोन्ही पोलीस हे छत्तीसगड पोलिसांचे आहेत.

महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीअंतर्गंत  सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही घटना छत्तीसगड राज्याच्या हद्दीत घडली आहे. जी महाराष्ट्र सीमेच्या चेकपोस्टपासून सुमारे 50 मीटर अंतरावर आहे. हा परिसर नक्षलग्रस्त असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसर, घटनास्थळी 10-12 जणांच्या महिला पुरुष नक्षल्यांच्या टोळीने विनाशस्त्र चहा पिण्यासाठी  गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.  या घटनेनंतर महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून जंगलात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह आणि ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह मोटारसायकलने चहा पिण्यासाठी पोलीस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर असलेल्या ढाब्याकडे गेले असता आधीच त्या परिसरात दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा  घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर एक पोलीस कर्मचारी  जखमी आहे.  जखमी पोलीस कर्मचाऱ्यांमुळे सदर घटना पोलिसांना मिळाल्याची माहिती समोर आली आहे. नक्षल्यांनी मोटारसायकलला आग लावून घटनास्थळावरुन पोबारा केला.

महाराष्ट्राची वाटचाल नक्षलवाद  मुक्त राज्याच्या दिशेने?

महाराष्ट्राची वाटचाल नक्षलवाद  मुक्त राज्याच्या दिशेने सुरू झालीय का? असा प्रश्न पडतोय. कारण मागील काही वर्षातली कामगिरी पाहता नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यातील संगठन नष्ट करण्यात यश आलेल आहे.  जाळपोळीच्या घटनांमध्ये, सामान्य नागरिकांच्या हत्यांमध्ये गेल्या वर्षभरात घट झाली आहे. माओवाद्यांना दिशा, निर्देश देणाऱ्या शहरी नेतृत्ववाला आळा घालण्यात महाराष्ट्राला यश मिळाले आहे. नर्मदाअक्का सारखे नेतृत्व हे कुठे वयामुळे थकले, तर हेम मिश्रा आणि प्रशांत राही सारखे प्रोफेशनल आणि नक्षली कुरियरचे काम करणारे देखील  पकडले गेले. तर अगदी वरावरा राव सारखे बुद्धिवादी समर्थक असो किंवा साईबाबा सारखा शीर्षस्थ छुपे नेतृत्व असो ते सुद्धा गजाआड गेले आणि त्याचा परिणाम एकंदरीत राज्यातील नक्षल चळवळीवर झाला आहे.

news reels Reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here