आमदार कांदे हे राष्ट्रवादीला एकामागून एक प्रवेशाचे धक्के देत आहेत. या अगोदरही नांदगावचे माजी नगराध्यक्ष बाळकाका कलंत्री व मनमाडचे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह काही माजी नगरसेविका आणि त्यांच्या पतींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड येथे शिवसेनेत प्रवेश केला.
रविवारी गंगाधरीचे सरपंच खैरनार व उपसरपंच इथे यांनी आमदार कांदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार कांदे म्हणाले की, आपल्याला येथे मानसन्मान मिळेल, आपल्या सूचना ऐकून घेतल्या जातील. तसेच विकासाकरिता सदैव आपल्यासोबत राहू अशी ग्वाही या वेळी शिवसेनेत प्रवेशकर्त्यांना दिली.
यावेळी जिल्हा प्रमुख किरण देवरे, गंगाधरीचे शिवसेना शाखाप्रमुख दिगंबर भागवत, रमेश गांगुर्डे, राजाभाऊ देशमुख, संजय आहेर, रामहरी ईथे, भगीरथ जेजुरकर, सोपान जाधव, नाना ईघे, साहेबराव मोकळ, संदीप खैरनार, अनिल बागुल, भरत ईघे उपस्थित होते.
या प्रवेशांमुळे आमदार कांदे यांची नांदगाव मतदार संघावर पकड अजून मजबूत झाली आहे तर दुसरी कडे राष्ट्रवादीसमोर आपले नेते आणि कार्यकर्ते ठिकून ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.