या सगळ्या राजकीय परिस्थितीकडे मी नेहमीच कुतूहलाने पाहिलेल आहे. मी जेव्हा बोलते तेव्हा व्यासपीठ कोणतं त्याच्यावर अवलंबून असतं. माझे प्रत्येकाशी खूप वैयक्तिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पण मला एवढचं म्हणायचे की, आत्ता जो काळ आहे तो काळ सर्वांसाठी कसोशीचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कार्यकर्ता पक्षाचा नेतृत्व करू शकतो हे नवीन मेसेज दिला आहे. हा मेसेज यशस्वी करणं आणि त्यांच्यासोबत असणारे सर्व लोक निवडून आणणं, ही कामगिरी करण्याची त्यांच्यासमोर संधी आहे. सत्तेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची त्यांच्याकडे संधी आहे. असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवसेना पक्षाचे नाव नसताना पक्ष उभा करणे हा मोठा प्रश्न आहे. त्या प्रश्नांचे उत्तर ते शोधतील आणि पुढे जातील, त्यामुळे ठाकरे आणि शिंदे हे दोघेही माझ्यासाठी पुढच्या काळात कुतूहलाचा विषय असणार आहेत. असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दरम्यान, बहीण म्हणून आपण उद्धव ठाकरे यांच्याशी बोलला आहात का? असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारला असता त्या म्हणाल्या, जे बहीण म्हणून बोलायचं आहे ते तुमच्यासमोर कशाला सांगू. तर उद्धव ठाकरे यांना सल्ला द्यावे इतकी मी मोठी नाही. मी सगळ्यांची लहान बहीण आहे. असंही त्या म्हणाल्या.
चिंचवड आणि कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती असं मुंडे म्हणाल्या आहेत. ‘कोणी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहायचं किंवा नाही राहायचं हा विषय आता मागे पडला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती पण आता लोक रिंगणात उतरले आहेत तर लढाई होईल. निकालानंतर स्पष्ट होईलच कुणाचं म्हणणं लोकांच्या मनामध्ये घर करत आहे’, असे पंकजा यांनी म्हटले.
४० स्टार प्रचारक भाजपकडे असताना देखील आजारी गिरीश बापट यांना प्रचारात उतरवलं गेले, यावर देखील पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपकडे जास्त स्टार प्रचारक आहेत त्याला आता आपण काय करणार. बापट साहेब हे सीनियर नेता आहेत. पण त्यांचा आशीर्वाद त्या निवडणुकीसाठी आवश्यक असेल असं पक्षाला वाटलं असेल आणि बापट साहेबांना ते करावसं वाटलं तर त्यात काही हरकत असण्याचे कारण नाही’, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.