मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक तरुणी नवले पुलावरुन जोरजोरात ओरडत होती. ती तरुणी ५० फूट उंचीवरून खाली उडी मारण्याच्या तयारीत होती. मात्र, नवले पुलाखाली वाहतूक नियमन करत असलेले वाहतूक पोलीस अंमलदार मिथुन राठोड, अमर कोरडे आणि स्थानिक नागरिक राजू जगताप, सागर बर्दापूरे, प्रदीप जोरे, श्रेयस तांबे व इतर जणांनी ही परिस्थिती पहिल्यानंतर काय करावं? समजेना असं झालं.
मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ पुलाखाली सतरंजी पकडली. काहीजण त्या महिलेला वाचविण्यासाठी पुलावर जाण्याच्या दिशेने निघाले. तोपर्यंत त्या महिलेने पुलावरून खाली उडी मारली. मात्र, वाहतूक पोलीस, स्थानिकांनी सतरंजी आणि हाताच्या सहाय्याने तरुणीला पकडल्याने तिचे प्राण वाचले. यामध्ये सदर तरूणी किरकोळ जखमी झाली असून जवळच्या खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.