वाचा:
मुख्यमंत्री राज्यात फिरत नाहीत, अशी टीका होत असतानाच मुख्यमंत्र्यांचा आज दौरा झाला. स्वत: कार चालवत मुख्यमंत्री पुण्यात दाखल झाले. सोबत पुत्र व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेही होते. पुण्यातील विधान भवन सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधींकडून सूचना जाणून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोविड १९ चा संसर्ग जिल्ह्यात किती दिवसात वाढत आहे, हे पाहून त्यादृष्टीने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात. शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून आरोग्य सुविधा सक्षम करावी. करोना रुग्णांसाठी अद्याप ठोस औषध अथवा लस उपलब्ध नसल्याचे सांगतानाच अशा परिस्थितीत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. वाढता रुग्णदर व मृत्यूदर कमी करणे हे आव्हान असून यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज आहे, असे सांगून करोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना सर्वांनी शासनाच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
टास्क फोर्समुळे परिणाम
राज्यात व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन ९५ मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून गरजेनुसार त्या-त्या भागात पुरवठा करण्यात येत आहे. महापालिकांना करोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्यात आली असून यापुढेही मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स बनविण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार टास्क फोर्स निर्माण होत आहेत. यामुळे करोना उपाययोजनामध्ये सुसूत्रता येईल. व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन ९५ मास्कचा पुरवठा १ सप्टेंबरनंतरही केंद्राकडून करण्यात यावा, अशी विनंती पंतप्रधानांकडे केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वाचा:
नियोजनात एकसूत्रीपणा हवा
तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण बऱ्याचदा रुग्णालयात जायला टाळाटाळ करतात. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून येत आहे. असे होवू नये यासाठी खासगी प्रयोगशाळांनी करोना अहवाल पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना परस्पर तपासणी अहवाल न देता संबंधित महापालिका यंत्रणेला द्यावा, जेणेकरुन रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होईल. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग यामध्ये एकसूत्रीपणा आणून सर्वांनी मिळून काम करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुण्यात वाढत्या रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टिने बेडची संख्या वाढविणे गरजेचे आहे. यामध्ये महानगरपालिकेने पुढाकार घ्यायला हवा. पुण्यासह नाशिक, औरंगाबाद महानगरपालिकांनीही बेडची संख्या वाढविण्यासाठी नियोजन करून त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी. यासाठी राज्यशासन महापालिकांना आर्थिक मदत निश्चित देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
वाचा:
संस्थात्मक अलगीकरणावर भर द्या
राज्यात करोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करताना सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असून गाफील राहता कामा नये. यात लोकसहभाग महत्त्वाचा असून मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याबाबत महापालिकेने नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांची गैरसोय होवू नये तसेच उपचारापासून रुग्ण वंचित राहू नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी राबविण्यासाठी विकेंद्रीकरण करावे, अशी सूचना त्यांनी केली. पुण्यात उभारण्यात येणाऱ्या जम्बो रुग्णालयाचे काम गतीने करावे. संगणकीय प्रणालीमध्ये बेड व्यवस्थापन व अन्य आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी. तसेच याचा आढावा वेळोवेळी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेने घ्यावा. झोपडपट्टी परिसरात छोटी घरे असल्यामुळे याठिकाणी गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक अलगीकरणांवर भर द्यावा. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होवू नये यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका तयार ठेवाव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
वाचा:
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी करोना परिस्थिती नियंत्रणासाठी दर आठवड्याला पुण्यात प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठका घेवून आढावा घेत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आतापर्यंत पुण्यात राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी खासगी रुग्णायालयांच्या शुल्क आकारणीवर नियंत्रण ठेवावे, करोनाच्या रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटा, व्हेटिंलेटरची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न करावेत. राज्य शासनाने महापालिकेला अर्थसहाय्य करावे. ससून रुग्णालयात तपासणी क्षमता वाढवावी अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केल्या. बैठकीला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनेक मुद्द्यांवर यावेळी सरकारला जाब विचारला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
Thanks so much for the blog post.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.