जयपूर: राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील पती-पत्नीचा मृत्यू झाला. तर नवरीचा भाऊ गंभीर जखमी झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह सीएससी शवागारात पाठवले. अपघातात जखमी झालेल्यांना प्रथमोपचारानंतर नागौरला हलवण्यात आलं.

कल्पना चावला शाळेजवळ रविवारी रात्री एका कारला अज्ञात वाहनानं धडक दिली. ही कार सिकरहून आली होती. या अपघातात कारमधील किशोर कुमार सैनी आणि त्यांची पत्नी किरण यांचा जागीच मृत्यू झाला. किशोर यांचा विवाह १५ फेब्रुवारीलाच झाला होता. १६ फेब्रुवारीला ते पत्नी किरण यांना घेऊन त्यांच्या फलोदी गावी पोहोचले. घरात आनंदीआनंद होता.
iPhoneसाठी कायपण! डिलिव्हरी बॉयला संपवलं; बॉडी ३ दिवस घरात; स्कूटीवरून नेऊन जाळली अन्…
१८ फेब्रुवारीला किशोर त्यांची पत्नी किरणला घेऊन स्वत:च्या सासरवाडीला गेले. १९ फेब्रुवारीला ते सासरवाडीतून निघाले. कुटुंबीयांनी किरण यांना निरोप दिला. त्यांची पाठवणी केली. किशोर आणि किरण निघाले. यावेळी किशोर यांचा मेहुणा कृष्ण कुमारदेखील त्यांच्या सोबत होता.

किशोर यांची कार नागौरच्या जायल येथील कल्पना चावला शाळेजवळ पोहोचली. त्यावेळी एका अज्ञात वाहनानं कारला धडक दिली. अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू झाला. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कृष्ण कुमार यांना प्रथमोपचारासाठी जायलमधील सीएससीला आणलं. कृष्ण कुमार यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना नागौरला हलवण्यात आलं.
नवरा, सासूला संपवलं; तुकडे फ्रिजमध्ये ठेवले; ६ महिने कोणालाच शंका नाही; पण…
अपघाताची माहिती नागौर पोलिसांनी दोघांच्या कुटुंबांना दिली. त्यानंतर मध्यरात्री दोघांचे कुटुंबीय जायलला पोहोचले. ‘रात्रीच्या सुमारास अपघाताची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं. कारमध्ये नवविवाहित दाम्पत्य मृतावस्थेत सापडलं. कारमध्ये एक तरुण जखमी अवस्थेत होता. दोन्ही मृतदेह शवागारात पाठवण्यात आले. तर जखमीला नागौरमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आलं,’ अशी माहिती पोलीस अधिकारी हरिश यांनी दिली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here